*तायवाडे कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये ” करीअर्स इन फार्मा मँनेजमेंट ” या विषयावर ऑनलाईन वेबिनार संपन्न*
नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले
नागपुर:- कोविड 19 च्या या परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांचे करिअर मार्गदर्शन होणे अतिशय आवश्यक आहे. हा हेतू लक्षात ठेवून श्री सच्छिदानंद शिक्षण संस्थेच्या तायवाडे कॉलेज ऑफ फार्मसी द्वारे *”करिअर इन फार्मा मँनेजमेंट “* या विषयावर वेबिनार चे आयोजन करण्यात आले. या वेबिनारमध्ये प्रमुख वक्ते म्हणून प्रा.उल्हास कारखानीस, असोसिएट डीन, पी.जी.डी.एम., आय.ई. एस. मँनेजमेंट कॉलेज अँड रिसर्च सेंटर,बांद्रा, मुंबई यांनी संस्थेच्या विद्यार्थ्यांना करिअर संदर्भात भविष्यात लाभ मिळावे यासाठी मार्गदर्शन केले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे आणि डॉ. शरयू तायवाडे यांनी असे कार्यक्रम आयोजित करण्यास प्रोत्साहित केले. प्राचार्य डॉ. चंद्रशेखर डोईफोडे यांनी प्रामुख्याने वेबिनार आयोजित करण्यात सहाय्य केले . वेबिनारची सविस्तर माहिती, तायवाडे कॉलेज ऑफ फार्मसीचे सहा. प्राध्यापक श्री ललित पुंड यांनी दिली.या कार्यक्रमकरिता प्रा.श्वेता , प्रा .रिया पोटभरे यांचे सहकार्य लाभले.
या ऑनलाईन कार्यक्रमात आफरिन शेख, अक्षय महंत, अविनाश खोब्रागडे, तौफिक शेख, आकांशा डांगे, इत्यादी विद्यार्थ्यांनी आपल्या शंका विचारल्या व त्याचे सविस्तर निराकरण प्रा. कारखानीस यांनी केले. या कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन श्री ललित पुंड यांनी केले.या अॉनलाईन वेबीनार मध्ये बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
Maharashtra News Media सच की आवाज