Breaking News

*तीडंगी येथील मोहफुलाची दारू केली गावकर्‍यांनी बंद* *केळवद पोलिसांनी दिली गावकऱ्यांना साथ* *गावकऱ्यांनी केला ठाणेदारांचा सत्कार*

*तीडंगी येथील मोहफुलाची दारू केली गावकर्‍यांनी बंद*

*केळवद पोलिसांनी दिली गावकऱ्यांना साथ*

*गावकऱ्यांनी केला ठाणेदारांचा सत्कार*

विशेष प्रतिनिधि

कळमेश्वर-  तालुक्यातील तिडंगी या गावातील मागील 25 वर्षापासून सुरु असलेली मोह फुलाची व अवैध देशी दारू ची विक्री महिलांनी व तरुणांनी पुढाकार घेऊन कायमस्वरूपी बंद केली.ही दारूबंदी करीत असताना गावकऱ्यांना प्रतिसाद देत केळवद चे ठाणेदार सुरेश मट्टामी व पोलीस कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.गावात दारूबंदी केल्याने” गाव करी ते, राव नाही करी” याचाच प्रत्यय गावकऱ्यांनी आणून दिला आहे.

तीडंगी या गावात एक विशिष्ट समाजातील सात ते आठ लोक बेड्यावर मोहफुलची दारू घरीच स्वतः तयार करून विक्री करित होते. मोहफुलाच्या दारूला मागणी असल्यामुळे या गावातून जिल्ह्यात दारू सर्वदूर विक्रीसाठी जात होती त्यामुळे तीडंगी हे गाव जिल्यात चर्चेत आले होते तसेच तेलगाव,तिष्टी, तेलंकामठी,दाडेरा नांदिखेडा,मांडवी व परिसरातील शौकीन गावात मोहफुलची दारू पिण्यासाठी येत होते त्यामुळे सायंकाळी गावाला जत्रेचे स्वरूप प्राप्त होत असे त्यामुळे गावाची सुरक्षा धोक्यात आली होती या दारुड्या महिलांना व गावातील राहवासी यांना नाहक त्रास सहन करावा लागत होता.नागपूर पोलीस अधीक्षकाच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वारंवार धाळ टाकून कारवाई केली व लाखो रुपयांची मोहफुलची दारू नष्ट करून मुद्देमाल जप्त केला परंतू एक दोन दिवसात परिस्थिती जैसें थे व्हायची. त्यामुळे गावातील रहवासी कमालीचे त्रस्त झाले होते. गावातील महिलांनी व युवकांनी एकजुटीने सुरू असलेली दारू विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला व केळवद पोलीस स्टेशन गाठले त्यांनी केलेल्या निर्णयाला ठाणेदार मट्टामी यांनी साद दिली व गावकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे पोलीस उभे राहील याची हमी दिली. पोलिसांच्या उपस्थितीत बेड्यावरील वरील दारू विक्रेत्यांच्या घरी धडक मोहीम राबविण्यात आली व वेळोवेळी मोहफुलची दारू नष्ट करून साहित्य जप्त करण्यात आले.नेहमी होणारे नुकसान व महिलांचे धाडस पाहून दारूविक्रेत्यामध्ये दहशत निर्माण झाली होती दारू विक्री च्या विरोधात एकजुटीने निर्माण झालेली चळवळ पाहून अखेर बेड्या वरच्या दारू विक्रेत्यांनी मोहफुलची दारू विक्रीचा बंद करण्याचा निर्णय घेतला.गावात दारू बंद झाल्याने गांधी जयंतीचे औचित्य साधून छोटेखानी कार्यक्रमात ठाणेदार सुरेश मट्टामी व पोलीस कर्मचाऱ्याचा यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी उपसरपंच रोशन राऊत, दिलीप घुगल, ग्राम सुरक्षा दलातील युवक, महिला बचत गटातील महिला व ग्राम पंचायत पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

तीडंगी येथील बेड्यावर अवैधरित्या कित्येक वर्षांपासून मोहफुलची दारू काढणे व विकणे सुरू होते मी रूजू झालो तेव्हापासून कारवाई करीत २० लाखाचा मुद्देमाल जप्त केला परंतू तीडंगी वासीयांच्या मदतीशिवाय दारुविक्री बंद करणे आव्हानच होते यासाठी गावात ग्राम रक्षक दल तयार करण्यात आले व त्यांनी कायद्याच्या चौकटीत राहून विक्रीसाठी जाणारी दारू वेळोवेळी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केली.ग्राम रक्षक दल व पोलीसांनी वारंवार दारू पकडली.गाव आपल्या विरोधात उभे असल्याचे पाहून त्यांचंबर दबाव निर्माण झाला त्यामुळे दारूविक्रेत्यानी दारू विक्री बंद केली.गावकऱ्यांच्या एकजुटीने, महिलामुळे व ग्राम रक्षक दल यांच्या मुळे गावात दारूबंदी झाली.
सुरेश मट्टामी
ठाणेदार पोलीस स्टेशन, केळवद

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …