Breaking News

*खासदार अशोक नेते यांच्याकडून नान्ने कुटूंबियांचे सांत्वन*

*खासदार अशोक नेते यांच्याकडून नान्ने कुटूंबियांचे सांत्वन*

गडचिरोली प्रतिनिधि- सूरज कुकुडकर

गडचिरोली- चंद्रपूर मार्गावरील बजाज शोरूमच्या मागील परीसरात 29 सप्टेंबर रोजी आलेल्या वादळी पावसात वीज पडुन अनिता गणेश नाने या 12 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. काल दि. 3 ऑक्टोबर 2020 खासदार अशोक नेते यांनी त्यांच्या घरी भेट देऊन नान्हे कुटुंबियांचे सांत्वन केले व सदर घटनेचा पंचनामा करण्याच्या सूचना प्रशासनास दिल्या व शासनाकडून सर्वतोपरी आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन नान्हे कुटुंबियांना दिले.

यावेळी अनुसूचित जनजाती मोर्चा चे प्रदेश संघटन सरचिटणीस प्रकाशजी गेडाम, जिप च्या समाज कल्याण सभापती रंजिताताई कोडाप, सावलीचे तालुकाध्यक्ष अविनाश पाल, तालुका महामंत्री सतीश बोम्मावार, उपस्थित होते.

गणेश नान्हे हे कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा येथील रहिवासी असून पोटाची खळगी भरण्यासाठी गडचिरोली येथे आले होते मात्र वादळी पावसात वीज पडून त्यांच्या 12 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याने त्यांच्यावर दुःखाचे डोंगर कोसळले असून शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देणार असून नान्हे कुटुंबियांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी खासदार अशोक नेते यांनी दिले. व नान्हे कुटुंबियांना 5 हजार रुपयांची आर्थिक मदत केली.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …