Breaking News

*गडचिरोली विधानसभा मतदार संघातील वसा पोर्ला गावाचे विकासाकडे वाटचाल* *आमदार डॉ होळी व उपसभापती विलास दशमुखे व स्थानिक लोकप्रतिनिधी गावकऱ्यांचा सामूहिक पुढाकार*

*गडचिरोली विधानसभा मतदार संघातील वसा पोर्ला गावाचे विकासाकडे वाटचाल*

*आमदार डॉ होळी व उपसभापती विलास दशमुखे व स्थानिक लोकप्रतिनिधी गावकऱ्यांचा सामूहिक पुढाकार*

गडचिरोली प्रतिनिधि – सूरज कुकुडकर

गडचिरोली – तालुक्यातील पोर्ला गडचिरोली जिल्ह्यातून प्रथमच देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ होळी यांच्या पुढाकाराने, आत्मनिर्भर भारत संकल्पनेनुसार पोर्ला या छोट्याश्या गावाची विकासाकडे वाटचाल सुरू झाली आहे गावात असलेल्या सुज्ञ नागरिक व लोकप्रतिनिधी यांचा पुढाकार व प्रयत्न या गावाच्या विकासासाठी मैलाचा दगड ठरला आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव रेशीम उद्योजक मधुकर पाटील खडतकर यांनी रेशीम उद्योगाच्या माध्यमातून गोरगरिबांना आर्थिक पाठबळ दिले आहे


गावातील सुपुत्र गडचिरोली जिल्ह्यातील प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉ प्रशांत भरणे यांनी महाराष्ट्र राज्यातील प्रथम आयुर्वेद क्लस्टर डेव्हलपमेंट योजना पोर्ला येथे सुरू केली आहे या माध्यमातून वनावर आधारित उद्योग व्यवसाय निर्माण झाले आहे सदर वनावर आधारित उद्योग बघण्यासाठी राज्यातील विविध आयुर्वेद चिकित्सा महाविद्यालयाचे विद्यार्थी नेहमी भेट देत असतात गावात ३३ के व्ही सब स्टेशन चे काम जोमात सुरू आहे .
ज्या माध्यमातून वारंवार इलेक्ट्रिक जाण्याची समस्या दूर होईल व गावाला उच्च दाबाचे वीज वितरण होणार आहे गावातील बचत महिला बचत गटांचे विकास होतोय बचत गटाच्या माध्यमातून विविध उद्योग व्यवसाय सुरू होत आहे येथील महिलांनी एकत्र येऊन महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून दूध व्यवसाय सुरू केला आहे, गावातील शाळा डिजिटल होत आहेत, आजच चवदाव्या वित्त आयोग निधीतून आमदार डॉ होळी यांच्या हस्ते संगणकाचे वाटप करण्यात आले , गावाचे संपूर्णपणे कायापालट होतोय , सुंदर रस्ते व नाली प्रतेक प्रभागात दिसत आहेत, गावकऱ्यांनी गावाचा कायापालट केल्याबद्दल आमदार डॉ होळी यांचा जाहीर सत्कार केला आज दिवसभर गावात विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला व मेक इन गडचिरोली चे वतीने आत्मनिर्भर भारत संकल्प अंतर्गत आमदार डॉ होळी यांचे ,महिला बचत गटांना प्रोत्साहन देणारे माहिती मार्गदर्शन कार्यशाळा व उद्योग मेळावा आयोजित करण्यात आला होता ,व स्थानिक शाळेत आमदार डॉ होळी व पदाधिकारी यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यावेळी आजच्या कार्यक्रमात प्रामुख्याने पंचायत समितीचे उपसभापती विलास दशमुखे , हेमंत पाटील बोरकुटे ,डॉ प्रशांत भरणे ,मधुकर खडतकार , भास्कर मेश्राम ,तलाठी चौधरी ,मुख्य अध्यापिका बागळे ताई ,अशोक चापले ,शुभम दशमुखे ,अशोक कर्णेवार ,दादाजी देशमुख , कल्याणी मुरकुटे ,बापूजी फरांडे ,संतोष दशमुखे ,मनोज किरमिरे ,उमेश आखाडे ,दादाजी दशमुखे व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते .

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …