*थोर पुरुषाचें समतावादी विचार समाजापर्यंत पोहचवणे गरजेचे – प्राचार्य अशलेषा मेश्राम*
मौदा प्रतिनिधी – रोशन रोशनखेडे
कामठी /मौदा- महात्मा गांधी व लालबहादूर शात्री यांचे संयुक्त जयंती निमित्ताने ड्रॅगन इंटरनॅशनल स्कूल कामठी येथे संबोधित करताना प्राचार्य अशलेषा मेश्राम यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शात्री यांचे समतावादी विचार समाजातील शेवट्च्या घटकापर्यंत पोहचवणे गरजेचे आहे. समाजातील असमानता हीच जातीयवादी कृत्याचे खरे कारण आहे.म्हणून सामान्य घटकाप्रयन्त समतावादी विचार रुजविणे गरजेचे आहे. गांधी जी एक महान व्यक्तिमहत्व होते त्यांच्या विचारांची समाजाला गरज अहिंसा दया या पद्धतीने त्यांनी भारत मनातली लोकांचे मन जिंकले आहे त्याचाच स्वरूप म्हणजे आज आपण स्वतंत्र आहो. पण कुठं तर त्यांचे विचार समाज विसरत आहे. त्यामुळे आजची आंदोलन पद्धती सुद्धा बदलली आहे हिंसा पद्धतीचे विदारक आंदोलन आपण पाहत आहो. इतिहास पुन्हा पडताडून पाहण्याची गरज आज तरुण पिढीला आहे. तेव्हाच इतिहास घडेल.ड्रॅगन इंटरनॅशनल स्कूल कामठी ही संस्था ऍड. सुलेखा ताई कुंभारे यांचे मानवतावादी विचारधारेतून उभी केलेली संस्था आहे करिता या शाळेच्या माध्यमातून समानता आधारित उपक्रम राबविल्या जात आहे. संयुक्त जयंती महोत्सवात संस्थेचे सचिव एम एन खैरे कर्मचारी पौर्णिमा मेश्राम,माहेशवरी ठाकरे,किरण सोमकुवर, निमा, सलमान खान, पुष्पां वंदिले, रीना मेश्राम उपस्थित होते
Maharashtra News Media सच की आवाज