*वर्ध्यात बँकेच्या ट्रेनिंगसाठी आलेल्या महिलेला हॉटेलमध्ये डांबून अत्याचार*

*शहर ठाण्यात गुन्हा दाखल खोलीत डांबून रात्रभर केले शोषण*
एका महिला बँक कर्मचाऱ्यावर हॉटेलच्या खोलीत डांबून बळजबरीने रात्रभर शारीरिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
वर्धा प्रतिनिधि- पंकज रोकडे
वर्धा : येथील हिंगणघाट जळीत प्रकरण ताजे असतानाच आता एका महिला बँक कर्मचाऱ्यावर हॉटेलच्या खोलीत डांबून बळजबरीने रात्रभर शारीरिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरुन उस्मानाबाद येथील एका युवकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपीस जेरबंद करण्याचे मोठे आव्हान सध्या पोलिसांसमोर आहे.
पोलीस सुत्रांनुसार, लातूर जिल्ह्यातील खंडपार तालुक्यातील २१ वर्षीय पीडितेने बीसीएचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर एनआयटी कॅम्पसमध्ये मुलाखत दिली. यात तिची निवड झाल्यानंतर ४५ दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यावर पीडितेची वर्धा येथील एका बँकेत बँकर कस्टमर आॅफिसर म्हणून नियुक्ती झाली. १३ मार्च २०२० पासून ती वर्धा येथील रामनगर परिसरातील मुलींच्या वस्तीगृहात राहत होती. काही दिवसानंतर पीडितेची आरोपी कुणाल अनिल पवार रा. उस्मानाबाद याच्याशी ओळख झाली. आरोपी कुणाल हा पीडितेला वारंवार फोन करुन त्रास देत होता.
Maharashtra News Media सच की आवाज