Breaking News

*पाण्यात बुडून 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू* *घोगरा शिवारातील घटना*

*पाण्यात बुडून 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू*


*घोगरा शिवारातील घटना*

विशेष प्रतिनिधी :- पंकज चौधरी

रामटेक/ नागपुर- सद्या हिवाळ्याच्या दिवसाला सुरुवात होत असून शहरी भागातील तसेच काही खेडे गावातील देखील तरुण-तरुणी,प्रौढ,म्हातारे असे सर्व व्यक्ती सकाळी फिरायला घराबाहेर पडत असतात.गावाकडे एक वेगळाच प्रकार दिसून येते.सकाळी फिरून झाल्यानंतर काही मुले पोहायला डोहात जात असतात.कदाचित हा त्यांचा दैनंदिन उपक्रम असू शकतो.

पण आज काही असं घडलं जे पाहून दुसऱ्यांदा कुणीच पोहायला त्या डोहात जाणार नाही.कु.अरविंद कैलास राऊत वय वर्ष 19 रा.बाबुरवाडा ता.पारशिवनी हा तरुण रोजप्रमाणे आजदेखील सकाळी फिरायला घराबाहेर पडला.मित्रांसोबत फिरून झाल्यानंतर पोहायला काळाफाटा गावाजवळ असलेल्या एका लहानशा डोहात शिरले.ते एकूण 6 मित्र असल्याची माहिती मिळाली.हे सर्व मित्र पोहण्याच्या आनंदात इतके गुंग झाले होते की,त्यांना वाढलेल्या पाण्याचा देखील अंदाज लागलेला नव्हता.आनंदात ते अतिशय खोल पाण्यात गेले आणि तिथेच अरविंद ला बरोबर पोहता येत नसल्याने त्याचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला..

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …