Breaking News

*मुसळधार पावसाने केली धान पिकाची उधडपट्टी* *शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान*

*मुसळधार पावसाने केली धान पिकाची उधडपट्टी*

*शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान*

 

रामटेक प्रतिनिधी:- पंकज चौधरी

रामटेक – तालुका हा प्रामुख्याने भात या पिकासाठी प्रसिद्ध असलेला आहे.तालुक्यातील बरेच शेतकरी भात पिकाचीच शेती करतात.अनेक शेतकरी आपल्या शेतात वेगवेगळ्या प्रकारच्या व्हेरायटीचे धान लावून शेती करतात.यापैकी काही कमी दिवसात येणारे तर काही जास्त दिवसात येणारे धान असतात.जोपर्यंत पीक शेतात उभं आहे तोपर्यंत त्याला पावसाचा पाणी काहीच करू शकत नाही.पण तोच पीक जर कापणीस येऊन, कापणीची प्रक्रिया पूर्ण होऊन शेतात पडलेल्या अवस्थेत असेल आणि पावसाचे पाणी त्यात शिरले की ते पूर्ण पीक कोणत्याच कामाचे राहत नाही.

भागात काही प्रमाणात शेतकऱ्यांनी कमी दिवसात येणाऱ्या धानाची लागवड केली होती.धान येऊन पूर्ण झाले,कापणी ची प्रक्रिया देखील पूर्ण झाली,पूर्ण कापलेलं पीक शेतात पडलेलं होत.अश्या वेळी कालच्या मुसडधार पावसाने आपली हजेरी लावून शेतकऱ्यांना डोक्यावर हात ठेवण्याची पाळी आणली आहे.शेतकऱ्यांचे पूर्ण पीक पाण्याखाली येऊन त्यांचं खूप मोठं आर्थिक नुकसान झालं आहे.अश्या काही शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन पाहणी करून त्यांना प्रशासनाने मदद करावी.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …