Breaking News

*सि.आर.पी.फ. 09 बटालियन कडून पेरमिली येथे विविध वस्तूंचे वाटप*

*सि.आर.पी.फ. 09 बटालियन कडून पेरमिली येथे विविध वस्तूंचे वाटप*

 

विशेष प्रतिनिधी

पेरमिली- आज दिनांक 08/10/2020 रोजी पेरमिली गावांमध्ये विविध गरजु वस्तूंचे वाटप करण्यात आले. यामध्ये पेरमिली पंचक्रोशीतील 20 मुलींना रोजगारासाठी 20 शिलाई मशीन व प्रमानपत्र वाटप करण्यात आले. तसेच मुकबधीर शाळेतील विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक साहित्य, स्पर्धा परीक्षा पुस्तके, टेबल-खुर्ची, कपाटे वाटप करण्यात आले. तसेच आश्रमशाळा पेरमिली शाळेला स्पर्धा परीक्षा पुस्तके, टेबल- खुर्ची, कपाटे वाटप करण्यात आले.


सदर कार्यक्रमासाठी सि.आर.पी.फ. 09 बटालियनचे कमांडंट रविंद्र भगत हे अध्यक्षस्थानी होते. तसेच 09 बटालियनचे व्दितीय कमांडंट राकेश कुमार श्रीवास्तव, डेप्युटी कमांडंट बी.सी. राय उपस्थित होते. तसेच उपपोस्टे पेरमिलीचे प्रभारी अधिकारी प्रदीप गायकवाड, पोउपनि पाटील तसेच माविम संचालित बचत गटांच्या अध्यक्षा शोभा मढावी, सोपान , तसेच गावातील पत्रकार डॉ. दुर्ग उपस्थित होते. तसेच पेरमिली गावातील आश्रय शाळेचे मुख्याध्यापक गजभिये सर, अंध अपंग शाळेचे मुख्याध्यापक सेमिसकार व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सि.आर.पी.फ. 09 बटालियनचे कंपनी कमांडर मुनीर खान यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व सि.आर.पी.फ. कर्मचारी यांनी कष्ठ घेतले.

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …