Breaking News

*ग्रामीण भागात घरोघरी बांधल्या जात आहे लाला रंगाच्या बॉटल ही केवळ अंधश्रद्धा – डॉक्टर वेद*

*ग्रामीण भागात घरोघरी बांधल्या जात आहे लाला रंगाच्या बॉटल ही केवळ अंधश्रद्धा – डॉक्टर वेद*

मौदा विशेष प्रतिनिधि

मौदा – मागील काही दिवसात ग्रामीण भागात कुत्रे येऊन त्यांनी शौच किंवा मूत्र विसर्जन घरासमोर किंवा भिंतीवर करू नये यासाठी अनेक लोकांनी बॉटल मध्ये लाल रंग टाकून त्या आपल्या घराच्या बाजूला बांधलेल्या असल्याचे दिसून येते विशेष म्हणजे हा प्रकार अनेक बुद्धिजीवी करताना दिसतात याबाबत ग्रामीण भागातही काही लोकांना विचारणा केली असता या लाल रंगामुळे कुत्रे त्या परिसरात शौच व मूत्रविसर्जन करीत नाही असे सांगण्यात आहे त्यामुळे अनेक लोक बॉटल मध्ये पाणी घेऊन त्यात कुंकू किंवा रंग टाकून घराभोवती बांधत असतात काहींच्या मते लाल रंगामुळे कुत्रे तिथे जात नाही आणि तो परिसर स्वच्छ राहतो
याबाबत नागपूर येथील पशु तज्ज्ञ श्री वेद यांना विचारणा केली असता ही केवळ अंधश्रद्धा असल्याचे सांगितले परंतु अनुकरण शील हा भारतीय माणसाचा गुणधर्म असल्यामुळे आज ग्रामीण भागातील अनेक लोक चिकित्सक विचार न करता एकाने केले म्हणून आपणही करावे यातून हा प्रकार ग्रामीण भागात वाढत आहे त्यामुळे ग्रामीण भागात बोली भाषेत एक म्हण आहे
आई हुलावली बाई हुलावली आणि बाईची कुत्री हुलावली ही म्हण या प्रकाराला चपखल बसते.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …