*जेष्ठ नागरीकाकडुन सती अनसूया माता पारडसींगा-देवस्थानास देणगी*
काटोल प्रतिनिधी- दुर्गाप्रसाद पांडे
काटोल- जेष्ठ नागरीक मंडळ काटोल चे मुख्य प्रवर्तक स्व. मारोतराव कोंडे गुरूजी, यांचे स्मृती प्रीत्यर्थ मंडळाच्या आजीवन सदस्या श्रीमती निर्मलाताई कोंडे व परिवाराकडून सती अनसूया माता पारडसींगा-देवस्थानास दिनांक 11.10.2020 ला रुपये 11,111=00 भरघोस देणगी मंडळाचे पदाधिकार्याचे उपस्थित देण्यात आहे.
दरवर्षी 10 आक्टोबर ला साजरा होणार्या जागतिक जेष्ठ नागरीक दिन महोत्सवासाठी श्रीमती निर्मलाताई कोंडे यांच्याकडून मंडळास देणगी दिली जाते. परंतु कोविड-19 च्या प्रादूर्भावामुळे यावर्षी हा महोत्सव मंडळाकडून साजरा करण्यात आला नाही. त्यामुळे मडंळाचे पदाधिकार्यांशी विचारविनिमय करून ही देणगी राशी सती अनसूया माता पारडसींगा-देवस्थान येथे देण्यात आली. व देणगी देण्याचा वार्षिक संकल्प अबाधित राहिला.
यावेळी कोंडे परिवारातील स्वतः श्रीमती निर्मलाताई कोंडे, त्यांची मुलं श्री अनिल,श्री सुशील, सुन सौ.उज्वला, नातवंडे कु.पुर्वा, यशीका कोंडे तसेच जेष्ठ नागरीक मंडळ काटोल चे अध्यक्ष श्री वामनराव खंडाळ , सचिव श्री गजाननराव भोयर , सल्लागार श्री विनायकराव राऊत ,सदस्य श्रीमती दुर्गाताई कडू , व सौ. अनिता भोयर प्रामुख्याने उपस्थित होते. शासन निर्देशाचे पालन करून सर्वांनी मनोभावे मातेचे समाधी दर्शन घेतले .
Maharashtra News Media सच की आवाज