Breaking News

*शेतकऱ्यांच्या धान पीक नुकसानीचे त्वरीत पंचनामे करून भरपाई द्यावी* *भारतीय जनता पार्टी,देवलापार मंडळातर्फे अप्पर तहसीलदारांना दिले निवेदन*

*शेतकऱ्यांच्या धान पीक नुकसानीचे त्वरीत पंचनामे करून भरपाई द्यावी*

 

*भारतीय जनता पार्टी,देवलापार मंडळातर्फे अप्पर तहसीलदारांना दिले निवेदन*

देवलापार प्रतिनिधी – पुरुषोत्तम डडमल

देवलापार:- गेल्या आठवड्यात परिसरात अचानक झालेल्या परतीच्या जोरदार पावसामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे कापनीला आलेले धान पिक पूर्णपणे जमिनीवर पाण्यात झोपले गेले.शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास या परतीच्या पावसाने हिरावला आहे. त्यामुळे शेतकरी बांधवाना चांगलाच आर्थिक फटका बसला आहे. या झालेल्या धान पिकाचे नुकसान भरपाई करीता शासनाने त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई द्यावी म्हणून अप्पर तहसीलदार देवलापार यांना भाजपा मंडळ अध्यक्ष लक्ष्मणराव केने यांचा नेतृत्वात आज सोमवारला दुपारी १ वाजताच्या दरम्यान निवेदन देण्यात आले.
या प्रसंगी ज्ञानेश्वर ढोक(जिल्हा महामंत्री अनुसूचित जाती आघाडी),हेमंत जैन,खेमेन्द्र फुलबेल,मनीष मडावी,सुंदरलाल ताकोद,नंदकिशोर कोहळे,सौ.आशिका राऊत,आदी परिसरातील शेतकरी बांधव अप्पर तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …