Breaking News

*’महाविकासचा आघाडीने मंदिरे बंद करून ठेवण्याचा निर्णय तातडीने मागे घ्या – आमदार दादाराव केचे*

*’महाविकासचा आघाडीने मंदिरे बंद करून ठेवण्याचा निर्णय तातडीने मागे घ्या – आमदार दादाराव केचे*

 

वर्धा प्रतिनिधी – पंकज रोकडे

आर्वी – विधानसभा क्षेत्राचे आमदार दादाराव केचे यांनी आर्वी तालुक्यातील श्री. क्षेत्र टाकरखेडा येथील लहानुजी महाराज देवस्थानाच्या मुख्य व्दारा जवळ लाक्षणिक उपोषण करून महाराष्ट्रात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडी सरकारनी बंद करून ठेवलेले राज्यातील मंदिर, मस्जिद, गुरूव्दारे, बौद्ध विहार, चर्च इत्यादी जनभावना लक्षात घेऊन तातडीने सुरू करण्यासाठी शासनाला सद्बुद्धी देऊन तातडीने धार्मिक स्थळातील प्रवेश बंदी उठविण्याची प्रार्थना श्री. लहानुजी महाराज चरणी केली. कोविड – १९ मुळे बाधीत झालेले पुर्णपणे ठप्प झालेले जनजीवन पुर्ववत होत असतांना बहुतांश जनसेवा सुरू झालेल्या आहे. महाराष्ट्र राज्याच्या सरकारने धार्मिक स्थळांपेक्षा मदिरालयांना प्राधान्य दिल्याने जनतेमध्ये कमालीचा रोश आहे. गेल्या सहा महिन्यांपासून असलेल्या लॉकडाऊन मुळे मानसिक तनावात असलेल्याला नव्याने ध्येयाच्या पुर्तीसाठी अंगी सकारात्मकता येण्यासाठी आध्यात्मिक प्रेरणादायी असणारी सुरू होणे गरजचे आहे.

लाक्षणिक उपोषण मंडपात उपस्थितांना मार्गदर्शन करते वेळी आमदार दादाराव केचे यांनी सांगितले की, धार्मिक स्थळांच्या परीसरातील अनेकांची उपजीविका या स्थळांना भेट देणाऱ्या भाविकांवर अवलंबून असते परंतू हि स्थळे बंद असल्याने अनेकांचे रोजगार बंद असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. भजन, किर्तन, प्रवचन यातून समाजप्रबोधन होऊन जीवन जगण्याची दिशा मनुष्याला प्राप्त होते. तसेच मात्र प्रेरनास्थानाच्या दर्शनाने आलेल्या कठीण प्रसंगाला समोर जाण्याची सकारात्मक उर्जा प्राप्त होत आहे. असे असतांनाही मंदीर बंद ठेवून केवळ महसूल वाढावा म्हणून मदिरालय सुरू करणे योग्य नसुन तातडीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनी सर्व धर्मियांचे प्रेरणास्थान असणारे स्थळे पावन भुमी जनतेसाठी खुले करावे असे आवाहन आमदार दादाराव केचे यांनी केले.

लाक्षणिक उपोषण मंडपात लहानुजी महाराजांच्या अभंगव्दारे वातावरण भक्तीमय झाले होते. उपोषणास संदिप काळे युवा नेते, अनिल जोशी, प्रशांत सव्वालाखे, विजय बाजपेयी आर्वी विधानसभा प्रमुख भाजपा, प्रशांत वानखेडे अध्यक्ष भाजप आर्वी तालुका, विनय डोळे, जगन गाठे, हनुमंत चरडे पंचायत समिती सभापती आर्वी, कांचन नांदुरकर जि. प. सदस्या, धर्मेद्र राऊत पं. स. सदस्य, सारीका अरविंद मेश्राम सरपंच टाकरखेडा, जितेंद्र ठाकरे अध्यक्ष भाजयुमो आर्वी तालुका, नंदूभाऊ थोरात, अशोक तुमडाम पं. स. सदस्य, दिपाली डोंगरे पं. स. सदस्या, बाळाभाऊ नांदुरकर, अवेज खान, अजय कट्टमवार, संजय थोरात, राहुल गोडबोले, अशोक निकम, सचिंन्द्र कदम, राजेश हिवसे, राजेंद्र ठाकरे, दिनेश डेहनकर, निखिल कडू, मनिष उभाड,मिलिंद हिवाळे, दिवाकर पेठे, रविंद्र वानी, धर्माजी तेलमोरे, देवीदास शिरपूरकर, कैलास चव्हाण, प्रविण ढेवले, गुणवंत कालोकार, राजाभाऊ वानखेडे, सागर ठाकरे, कुणाल कोल्हे यांच्या सहीत परीसरातील नागरीकांची तसेच भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची लक्षणीय उपस्थिती होती.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …