*खैरी येथे कोरोना योद्धांच्या सत्कार*

*खैरी येथे कोरोना योद्धांच्या सत्कार*


कामठी तालुका प्रतिनिधी – सुनील चलपे 


कामठीः सरपंच बंडू कापसे यांच्या कर्तुत्व शैलीने ग्रामपंचायत व शासकीय स्तरावरील विविध विकास कामे प्राधान्याने पार पाडीत  सामाजिक दायित्व ला महत्त्व देत कोविड 19 महामारी च्या पार्श्वभूमीवर  नुकताच माझे कुटुंब,  माझी जबाबदारी या पहिल्या टप्याचे काम सर्व्हे व ऑनलाईन करून  100%पूर्ण करण्यात आले त्या निमित्याने ग्रामपंचायत  खैरी येथे पंचायत समिती कामठी सभापती  उमेश रडके,पंचायत समिती कामठी चे खंड विकास अधिकारी,अंशुजा  गराटे,तालुका आरोग्य अधिकारी  डॉ. संजय माने, वैधकीय अधिकारी  डॉ. राहुल राऊत, सामुदायिक वैधकीय अधिकारी  डॉ. वैशाली गोंन्नाडे,पंचायत समिती कामठी चे आरोग्य विस्तार अधिकारी मनीष दिघाडे,  कवठा पंचायत समिती सदस्य . दिशा  चानकापुरे यांच्या प्रमुख  उपस्थितीत,  ग्रामपंचायत खैरी चे सरपंच बंडू कापसे सह   उपसरपंच,  सदस्य,  गावातील स्वयंसेवक,  आशावर्कर,  अंगणवाडी सेविका,आरोग्य सेविका व   मदतनीस या कोविड योद्धांना सन्मान पत्र शाल श्रीफळ  देऊन  हार्दिक अभिनंदन करण्यात आले.


कार्यक्रमाच्या शेवटी  सर्व कोरोना योद्धांनी येणाऱ्या दिवसात  गाव संक्रमण मुक्त करण्यासाठी सदैव तत्पर असल्याचे सांगितले  झाल्यास पून्हा सेवा देण्याची शपथ घेतली.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …