Breaking News

*हाथरस  सामूहिक बलात्कार प्रकरणाच्या निषेधार्थ कांग्रेस चे तहसीलदार मार्फत राष्ट्रपतींना सामूहिक निवेदन सादर*

*हाथरस  सामूहिक बलात्कार प्रकरणाच्या निषेधार्थ कांग्रेस चे तहसीलदार मार्फत राष्ट्रपतींना सामूहिक निवेदन सादर*

कामठी प्रतिनिधि – सुनील चलपे
कामठीः उत्तरप्रदेश राज्यात रामराज्य असलेल्या उत्तरेत रामायण लिहिणाऱ्या वाल्मिकी ऋषींच्या वंशजाला पाशवी अत्याचाराला बळी पडावे लागले ही घटना  मानवी काळिमा फासणारी घटना आहे.

उत्तरप्रदेशातील हाथरस गावातील बुलगाडी येथे एका 19 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला.या बलात्कार पीडित तरुणीचा उपचारादरम्यान दिल्लीच्या सफदरगंज येथील रुग्णालयात  मंगळवारी  मृत्यू झाला .मध्यरात्री 3 वाजता पीडित तरुणीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मृतक तरुणीचा मृतदेह घरी आणला जावा यासाठी पोलिसांना वारंवार विनंती केली जात होती मात्र पोलिसांनी ही विनंती फेटाळत युपी पोलिसांनी जबरदस्ती  मध्यरात्री 3 वाजता पीडित तरुणीवर अंत्यसंस्कार केल्याचा आरोप मृतक तरुणीच्या कुटुंबीयांनी केला आहे तेव्हा या सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींचा तात्काळ शोध घेत त्यांना लवकरात लवकर अटक करून सामूहिक फाशी देण्यात यावी  या मागणीचे निवेदन कांग्रेस च्या वतीने महाराष्ट्र प्रदेश महासचिव व माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर याच्या नेतृत्वात  कामठी तहसीलदार मार्फत राष्ट्रपतींना देण्यात आले.सामूहिक  निवेदन नायब तहसीलदार रणजित दुसावार यांना देण्यात आले.

याप्रसंगी कांग्रेस चे पदाधिकारी कामठी  नगर परिषद चे माजी उपाध्यक्ष व नगरसेवक काशीनाथ प्रधान, माजी सभापती व नगरसेवक नीरज लोणारे, बाल्या काळे राजकुमार गेडाम,इर्शाद शेख, सलामत अली,  मो सुलतान, सुशांत यादव, नितेश यादव, निखिल फलके, अफसर खान, आदी कार्यकर्ता गण प्रामुख्याने उपस्थित होते.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …