Breaking News

*ग्रामपंचायतीवर अवलंबून न राहता केले ग्रामस्थांनी पांधण रस्त्याचे दुरुस्ती* *बोरडा वासीयांचा आगळावेगळा उपक्रम*

*ग्रामपंचायतीवर अवलंबून न राहता केले ग्रामस्थांनी पांधण रस्त्याचे दुरुस्ती*

*बोरडा वासीयांचा आगळावेगळा उपक्रम*

रामटेक प्रतिनिधी  पंकज चौधरी

रामटेक / बोरडा  – मागे दिवशीच्या सततच्या पडणाऱ्या पावसाने अनेक लहान-लहान तलाव,पूल यांना जास्त प्रमाणात पाणी आले होते.या पाण्याने पांधण रस्त्यावर असलेले लहान मोठे पूल पूर्णपणे उध्वस्त झालेले दिसून आले होते.त्या मार्गावर असलेल्या अनेक शेतकऱ्यांनी तुटलेला पूल दुरुस्त करून घ्यावे याबद्दल ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद सदस्य श्री.संजू झाडे यांना माहिती देऊन सुद्धा त्यांनी कोणतेही पाऊल उचलले नाही.शेवटी त्या मार्गावर असलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या कामाच्या वेळेतून वेळ काढून तुटलेल्या पांधण रस्त्याचे दुरुस्ती करून तो रस्ता उपयोगात आणले.

 

यात प्रामुख्याने सुखदेव जांभुळे, योगेश्वर सोनवाने, नंदकिशोर मिसार, सुभाष भरडे,मनोज राऊत,आशिष गजबे,पंकज गजबे तसेच इतर शेतकरी यांनी महत्वाची भूमिका बजावली.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …