*सराईत गुन्हेगाराची गळा चिरून हत्या*

*जुगाराच्या वादातून घडली घटना*

*अवघ्या चार तासात आरोपी गुन्हे शाखेच्या ताब्यात*
खापरखेड़ा विशेष प्रतिनिधि
सावनेर – तालुक्यातील खापरखेडा येथे एका सराईत गुन्हेगाराची गळा चिरून हत्या केल्याची घटना स्थानिक पोलीस स्टेशन हद्दीतील दत्तनगर परिसरात १४ ऑक्टोबर बुधवारला सायंकाळच्या सुमारास जुगाराच्या वादातून घडली असून परिसरात एकच खळबळ उडाली असून घटनास्थळावरून पसार झालेल्या आरोपीना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे
प्राप्त माहिती नुसार हत्या करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगारांचे नाव अश्विन श्यामराव ढोणे वय वार्ड क्रमांक ४ इंदिरा नगर आबादी, खापरखेडा असे असून शुभम राजेंद्र पाटील, तुषार उर्फ शूटर प्रमोद नारनवरे, केशव उर्फ शानु ओमबहादूर थापा यांच्यासह एका नाबलीक आरोपीला अटक केली आहे मृतक अश्विन सराईत गुन्हेगार असून त्याच्या वर विविध पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हे दाखल आहेत एका आठवड्यापूर्वी मृतक अश्विनला खापरखेडा पोलिसांनी देशी कट्टा व दोन जिवंत काडतुसासह अटक केली होती.
मुख्य आरोपी शुभम पाटील व नाबालिक आरोपीने मौदा येथे तीन चार दिवसांपूर्वी अडीच लाखाचे सोने चोरी केले होते याची माहिती मृतक अश्विनला मिळाली होती त्यामूळे मृतक सदर चोरीच्या रकमेत अर्धा हिस्सा मागत होता त्यामुळे त्यांच्यात मागील दोन तीन दिवसांपासून वाद सुरू होता घटनेच्या दिवशी १४ ऑक्टोबर बुधवारला सायंकाळच्या सुमारास दत्तनगर वार्ड क्रमांक २ मुन्ना गॅरेजच्या मागे असलेल्या खाली जागेत मृतक अश्विन व घटनेतील आरोपी एकत्र दारू पित बसले होते यात परत पैश्यावरून वाद झाला अश्विनचाला पैसे द्यायचे नसल्याने आरोपींनी अश्विनचा गळा चिरून हत्या केली पोलिसांना घटनास्थळावर दारूची बाटली, चप्पल, एमएच ४९-झेड-३४१४ दुचाकी आढळून आली घटनेची माहिती मिळताच खापरखेडा पोलीस व नागपूर ग्रामीण चे एस पि राकेश आेला एडिसनल एसपी राहुल मकडनिकर एचडीपीई नयन आलुरकर व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल जिट्टावार व त्यांचे पथक घटनास्थळावर दाखल झाले होते रात्री गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीला ताब्यात घेऊन खापरखेडा पोलिसांच्या स्वाधीन केले खापरखेडा पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करून घटनेतील आरोपींना अटक केली पोलीस निरीक्षक चंद्रकात काळे यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सुरू आहे.
Maharashtra News Media सच की आवाज