Breaking News

*कंत्राटी कामगारांनी घेतली माझे कुटुंब, माझी जबाबदारी ची शपथ*

*कंत्राटी कामगारांनी घेतली माझे कुटुंब, माझी जबाबदारी ची शपथ*

नागपूर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले

नागपूर :- खापरखेडा पोलीस स्टेशन मध्ये दिनांक 14. 10. 20 रोजी सकाळी दहा वाजता धम्म प्रवर्तक दिनाचे औचित्य साधून वाढत्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव लक्षात घेतात खापरखेडा पोलीस स्टेशन मध्ये छोट्या दिवाणखान्यात पावर फ्रन्टचे पदाधिकारी व औष्णिक विद्युत केंद्र, 500X1 मेगावँट, खापरखेडा येथील कंत्राटी कामगार यांनी माझे “कुटुंब माझी, माझी जबाबदारी” ची शपथ घेतली. खापरखेडा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रकांत काळे यांच्या उपस्थितीत शपथ घेतली. याप्रसंगी पोलीस निरीक्षक चंद्रकांत काळे म्हणाले की प्रत्येक नागरिकांनी आपली काळजी घेणे आवश्यक असून आपण मोलमजुरी करिता दिवसरात्र भटकतो आपला संपर्क अनेक लोकांसोबत होतो. त्यावेळेस आपण सोशल डिस्टसिंग, तोंडाला मास्क, सँनीटायझरचा वापर करावा जेणेकरून आपण घरी जाताना सुरक्षित गेलो पाहिजे असे ते बोलत होते.

पावर फ्रंन्ट खापरखेडा शाखा अध्यक्ष भुपेंद्र चतुवैदी म्हणाले की, कोरोणाने सर्व नागरिकांना सोडो की पळो करून सोडलेले आहेत अनेक लोकांचा रोजगार कोरोना मुळे बुडालेला आहे. त्याकरिता कोरोना पासून आपण स्वतःची काळजी स्वतः करावी प्रकृतीबरी राहिली तर आपण जग जिंकू शकतो असे बोलत होते.

या कार्यक्रमाला उपस्थित पावरफ़्रंट कंत्राटी कामगार यूनियन चे पदाधिकारी रोशन गोस्वामी, मुकेश ढोले, प्रविण हाते, मोनू पांडे, मनीष भोंडेकर, प्रविण लांजेवार दत्ता शिंदे, व कामगार व पुलिस अधिकारी आदी उपस्थित होते.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …