*श्री महालक्ष्मी जगदंबा मंदिर कोराडी येथे नवरात्र उत्सवात भाविकांसाठी विशेष सोय*

नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले
नागपुर:- कोरोना संक्रमणामुळे महाराष्ट्र सरकारने जारी केलेल्या निर्देशानुसार, नवरात्र उत्सवाच्या काळात (दि. १७ ऑक्टोंबर ते २५ ऑक्टोंबर ) कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी सुरू राहणार नाही. भाविकांच्या श्रध्देचा आदर करून मंदिर दर्शनासाठी तातडीने सुरू करण्यात यावे, अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे. परंतु सरकारने याबाबत अद्याप सकारात्मक निर्णय घेतलेला नाही. सरकारच्या निर्णयाची आपण सर्वजण वाट पाहत आहोत. परंतु भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान, कोराडीच्या वतीने UCN channel वर श्री जगदंबा मातेच्या दर्शनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

*अखंड ज्योत प्रज्वलित :*
मंदिरात यावर्षी नवरात्र उत्सवाच्या काळात अखंड ज्योत प्रज्वलित राहणार आहे. ज्या भक्तांना आपल्या नावाने ही ज्योत लावायची आहे, त्यांनी कृपया मंदिरात संपर्क साधावा,
Maharashtra News Media सच की आवाज