Breaking News

*बॅरिस्टर शेषराव वानखेडे महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिवस साजरा*

*बॅरिस्टर शेषराव वानखेडे महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिवस साजरा*

नागपूर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले

नागपूर :- शेषराव वानखेडे महाविद्यालय खापरखेडा येथे ग्रंथालय विभागाच्यावतीने भारताचे महामहिम माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला कोविड 19 चा प्रादुर्भाव पाहता हा कार्यक्रम विद्यार्थ्यांकरीता ऑनलाईन प्राध्यापकांकरिता कलाम लिखित पुस्तकाचे प्रदर्शन भरून घेण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ आर जी टाले यांनी डिजिटल ग्रंथालय ज्यात कोणत्याही पुस्तकावर बोटाने स्पर्श केल्यास ते पुस्तक वाचकांना वाचण्यास उपलब्ध होईल. त्याची लिंक प्राचार्यांच्या हस्ते व्हाट्सअप ॲप ग्रुप तसेच फेसबुक इतर नेटवर्किंग साईटस उपलब्ध करून देण्यात आल्या. प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने वाचनाचे महत्त्व भावी विद्यार्थी घडविण्यात कसे साहाय्यभूत ठरते यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाच्या आयोजक ग्रंथपाल डाँ संगीता चोरे यांनी डिजिटल ग्रंथालयाचे प्रात्यक्षिक व्हिडिओच्या माध्यमातून उपस्थितांना करून दाखविले. तसेच याप्रसंगी त्यांनी कलाम लिखित तेजस्वी हम होंगे कामयाब, आपका भविष्य आपके हाथ अशी विविध पुस्तके पीडीएफ फॉरमॅट मध्ये विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली. तसेच विद्यार्थ्यांना गूगल फाँर्मद्वारा तयार करण्यात आला प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर वर्ग उपस्थित होते प्राध्यापक डॉ ज्योती सेलूकर यांनी संचालन तर प्राध्यापक डॉ राजेंद्र राऊत यांनी उपस्थितांचे आभार मानले*

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …