Breaking News

*Online सहयोग शिक्षक प्रमाणपत्र वितरण सोहळा संपन्न*

*Online सहयोग शिक्षक प्रमाणपत्र वितरण सोहळा संपन्न*


विशेष प्रतिनिधी मौदा


मौदाः भारत स्वाभिमान ट्रस्ट व पतंजलि जिल्हा कार्यालय नागपूर तर्फे Online सहयोग शिक्षक प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते…….या प्रशिक्षणात सहभागी मौदा तालुक्यातील प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वितरण सोहळा पतंजलि योग समिती मौदा द्वारा दि.१८आक्टोबर२०२० रविवारला सकाळी ठिक ७ वा. NTPC Hall आजनगाव येथे आयोजित केला. या सोहळ्यात सौ.रोशनीताई कनोजे व प्रणय लूटे यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले तसेच श्री.गोपालजी ढोबळे व सागर दुधबर्वे यांना प्रमाणपत्र मिळाले……..या कार्यक्रमाला आजनगाव येथील सरपंचा माननिय सौ.निताताई प्रदिपराव पोटफोडे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होत्या तसेच पतंजलि योग समिती मौदाचे पदाधिकारी श्री.सुनिलजी बोरकर,श्री.दिनेशजी ढोबळे,श्री.प्रकाशजी कोरडे,श्री.देवेन्द्र सोनटक्के,योगवर्ग संचालक श्री.नंदकिशोर कनोजे,प्राथमिक आरोग्य केंद्र आजनगाव योगशिक्षिका सौ.प्रांजलीताई वैद्य ,कु.मृणाल ढोबळे,कु.क्रीष्णा ठाकरे व योगसाधक बंधू-भगिनी उपस्थित होते .

आजच्या या प्रमाणपत्र वितरण सोहळ्यानिमित्त विशेष योगवर्ग महिला पतंजलि मौदा तालूका प्रभारी सौ.मोनिकाताई सुनिलजी ठाकरे यांनी घेतला व योगसाधकांना आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी व निरोगी राहण्यासाठी सविस्तर मार्गदर्शन केले तसेच योगसाधकांनी कोविड१९ नियमांचे पालन करीत योगवर्गाला यावे व येताना मास्क,सॕनिटायजर आणावे व सुरक्षित अंतर ठेवून बसावे या सुचना दिल्या..या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचे मौदा योग समितीच्या वतीने आभार मानले.. आपली व आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता दररोज योग करा व निरोग रहा असे निवेदन पतंजलि योग समिती तालुका मौदा प्रभारी देवेंद्र सोनटक्के यांनी केले.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …