Breaking News

*गडचिरोली चकमकीत ५ नक्षलवादी ठार* *धानोरा तालुक्यातील कोसमी-किसनेली जंगलातील घटना*

*गडचिरोली चकमकीत ५ नक्षलवादी ठार*

*धानोरा तालुक्यातील कोसमी-किसनेली जंगलातील घटना*

गढ़चिरोली प्रतिनिधि – सूरज कुकुडकर

गडचिरोली – उपविभाग धानोरा अंतर्गत येत असलेल्या पोलिस मदत केंद्र ग्यारापत्ती हद्दीतील कोसमी-किसनेली जंगल जंगलात परिसरात आज दुपारी ४ वाजताच्या सुमारास झालेल्या पोलिस-नक्षल चकमकीत ५ नक्षलवादी ठार झाल्याची घटना घडली. मृत नक्षल्यामध्ये २ पुरुष व ३ महिलांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

रविवार १८ आॅक्टोबर रोजी दुपारी सी-६० पथकाचे जवान कोसमी-कसनेली जंगल परिसरात संयुक्तपणे नक्षलविरोधी अभियान राबवीत जंगलात दबा धरून बसलेल्या नक्षल्यानी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनीही जोरदार प्रत्त्युत्तर देताच नक्षलवादी घटनास्थळावरून घनदाट जंगलात पसार झाले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता २ पुरुष व ३ महिला नक्षल्यांचे मृतदेह आढळून आले. मात्र या चकमकीत पोलिसांचे कुठलेही नुकसान झाले नाही, अशी प्राथमिक माहिती पोलिस प्रशासनाने दिली. पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी जिल्ह्याचे सुत्रे सांभाळल्यानंतर महिनाभरातील ही पहिलीच मोठी कारवाई आहे.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …