Breaking News

*जिल्ह्यातील स्थानिक कामगाराना नौकऱ्या द्या अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करणार: चंद्रपुर जिल्हाप्रमुख शिवसेना*

*जिल्ह्यातील स्थानिक कामगाराना नौकऱ्या द्या अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करणार: चंद्रपुर जिल्हाप्रमुख शिवसेना*


वरोरा प्रतिनिधि – जुबेर शेख

वरोरा – भद्रावती तालुक्यातील विविध कोळसा खदान व कारखान्यामध्ये स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याबाबत शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन मध्ये यांनी निवेदन सादर केले.
covid-19 च्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील कामगारांचे हातात असलेले काम गेले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील बेरोजगारीचा दर दुपटीने वाढला असून अशीच परिस्थिती असल्यास बेरोजगारांचा उद्रेक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या विषयाची खंबीरता लक्षात घेऊन शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी यांना कामगारांच्या वतीने सोमवारी सकाळी उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे यांना निवेदन देण्यात आले.

जी एम आर , वर्धा पावर प्लांट, सनफ्लॅग कोळसा खदान, कर्नाटका एम्टा भद्रावती, एकोणा माईन्स वरोरा, एस आर के , या सर्व कंपन्यांमध्ये स्थानिक बेरोजगारांना सामावून घेण्यासाठी शिवसेना निर्णायक भूमिका घेऊन भूमिपुत्रांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिल्या शिवाय शिवसेना शांत बसणार नाही असे मत जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांनी व्यक्त केले.

काही कंपन्यांमध्ये उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्यप्रदेश, तेलंगणा या राज्यातून कामगार आणून कंपनी चालवीत आहे. कोरोनामुळे जिल्ह्यातील कामगार मोठ्या प्रमाणात वापस आले असून त्यांच्या रोजगाराचा प्रश्न मोठ्या भेडसावत आहे.
स्थानिक कामगार आंदोलन करतात त्यामुळे ह्या कंपन्या मोठ्या प्रमाणात बाहेर राज्यातून कामगार आणून मनमानी कारभार चंद्रपूर जिल्ह्यात चालवत आहे. कोणतीही पोलीस चौकशी न करता व कोविड संदर्भात कोणतीही दक्षता न घेता वरोर्यातील कंपनीमध्ये परराज्यातून मोठ्या प्रमाणात कामगार येत आहे. बऱ्याच कंपन्यांमध्ये नोकऱ्या खाली असून हेतूपुरस्पर स्थानिक कामगारांना डावलण्यात येत आहे. या बाबीकडे कोणत्याही लोकप्रतिनिधीचे लक्ष नसून येणाऱ्या दिवसात बेरोजगारांची क्रांती उभी राहील असे चित्र चंद्रपूर जिल्ह्यात उभे राहिले आहे.
त्यामुळे प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे वेळेस लक्ष देण्याची गरज आहे.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …