Breaking News

*स्त्रीने स्वतःला जागृत करायला हवे : सारीका डफरे*

*स्त्रीने स्वतःला जागृत करायला हवे : सारीका डफरे*

नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले

नागपुर:- स्त्रीने ने स्वतःला स्वतःच जागृत करायला पाहिजे,आपल्या मर्यादा तिला समजायला हव्यात. तिच्यावर होणारा अन्याय तिला व्यक्त करता आला पाहिजे.तिने स्वतःला मानसिक गुलामगिरीतुन मुक्त करायला हवे आणि तिने स्वतःसाठी वेळ काढून स्वतःला आनंदी कसे करता येईल याकडेही लक्ष दिले पाहिजे,असे मोलाचे मार्गदर्शन या कार्यक्रमाप्रसंगी सारीका डफरे यांनी व्यक्त केले.
कोविड 19 च्या या परिस्थितीमध्ये स्त्रीयांना योग्य मार्गदर्शन होणे अतिशय आवश्यक आहे. हा हेतू लक्षात ठेवून श्री सच्छिदानंद शिक्षण संस्थेच्या तायवाडे कॉलेज महादुला – कोराडी येथे महाविद्‍यालयातील वूमन सेल समीती अंतर्गत *” स्त्री शक्तिचा जागर “* या विषयावर गुगल मिट द्वारे वेबिनार चे आयोजन करण्यात आले. या वेबिनारमध्ये प्रमुख वक्ते म्हणून सारीका डफरे,प्रादेशिक प्रभारी संचालक,कामगार शिक्षण मंडळ,श्रम व रोजगार मंत्रालय,भारत सरकार नाशिक या होत्या.यांनी संस्थेमधील विद्यार्थ्यांनींना भविष्यातील होणा-या त्रासापासून मुक्त करण्‍यासाठी मार्गदर्शन केले.महाविद्‍यालयातील प्राचार्य डॉ. शरयू तायवाडे या अध्यक्ष म्हणून उपस्थित होत्या .यांनी असे कार्यक्रम आयोजित करण्यास प्रोत्साहित केले.व स्त्रीयांच्या सबलिकरणाच्या दृष्टिकोनातून योग्य मार्गदर्शन केले. वेबिनारची सविस्तर माहिती, तायवाडे कॉलेजच्या इंग्रजी विभागप्रमुख डॉ.वर्षा वैद्य यांनी दिली.या कार्यक्रमकरिता वुमन सेल समीतीच्या सदस्यांचे सहकार्य लाभले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन डॉ.वर्षा वैद्य यांनी तर आभारप्रदर्शन डॉ.प्रेरणा थोरात यांनी केले.या अॉनलाईन वेबीनार मध्ये बहुसंख्‍य विद्यार्थीनीनी सहभाग घेतला.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …