*चंद्रपुर आर टी ओ ऑफिस मध्ये कंप्यूटर ने प्रिंट असलेल्या चालनवर हाताने आंकड़े बदलविन्याचा धक्कादायक प्रकार*
*विशेष प्रतिनिधी चंद्रपूर*
*चंद्रपूर – आर टी आे व्दारा कोणत्याही प्रकारची चारचाकी मालवाहू,प्रवासी अथवा खाजगी गाडी पकड़ली असता त्याला चालान करण्याचा व दंड आकारणाच्या अधिकारी राज्य रस्ते परिवहन नियंत्रन विभागाचे अधिकार क्षेत्र आहे.*
*परंतू वाहन मालक चंद्रपुर डेप्युटी आर टी आे कार्यालयात आकारण्यात आलेल्या दंड चालान पावती व्दारे भरण्याकरिता गेला असता,कार्यालयातील कर्मचारीयांनी प्रिंटेड चालान वर हाताने खोड़तोड करून दोन हजाराची रक्कम वाढविन्यात येणे ही नेहमीचीच बाब असल्याचे बोलल्या जात आहे.*
*चालान पावती प्रिंटेड असताना हाताने हाताने खोड़तोड़ करुण छापील आकड्यापेक्षा दुप्पट तीप्पट रक्कम करण्याची गरज काय असा प्रश्न निर्माण होत असुन हाताने आकारलेली रक्कमे बद्दल वाहन धारकांने विचारना केली असता “क्या गाडी महीने भर के लीये सस्पेंड करणा है क्या,क्या रास्ते पर चलना नही है क्या”अश्या जाचकांचा भडीमार सहन करित आरटीओ व्दारे आकारलेली रक्कम मुकाट्याने भरण्यास वाहन धारक बेबस असतात*
*ऐकीकडे कोरोनाच्या महामारी मुळे संपूर्ण जग जागच्या जागीच थांबले आहे.अश्यात सर्वात जास्त हाल होत आहे ते वाहन चालक मालकाचे.कोठूनतरी कसेतरी ते आपली उपजीविका भागवीत असुन अश्यात चंद्रपूर आरटीओ व्दारे राबविण्यात येणार्या या मनमानी धोरणामुळे वाहन चालक मालकात कमालीचा असंतोष पणपत आहे.चंद्रपूर आरटीओ कार्यालयात सुरु असलेल्या या गैरप्रकाराची योग्य व उच्चस्तरीय चौकशी करुण न्याय मिळावा अशी अपेक्षा वाहन चालक मालका व्दारे संबधित विभागाकडून केली आहे*
Maharashtra News Media सच की आवाज