*भुसेवाडा येथील नागरिकांनि बांधला इतिहास कालिन पुलिया*
*शासनाचे अक्षम दुर्लक्ष*
पेरमिली प्रतिनिधि – श्रीकांत दुर्ग
*गडचिरोली ः जंगल,नद्या व डोंगराळ भागाने व औषधियुक्त वनस्पती ने आछ्चादलेला जिल्हा म्हणून गडचिरोली जिल्हाकडे पाहल्या जाते तसेच दुर्गम रस्ते काळकोट घनदाट जंगले व त्यात वास्तव्य करणारे ग्रामीण बाहूल एकीकडे दळणवळणाची मोठी गैरसोय, स्थानिक जनप्रतिनीधीं व शासनाच्या सतत उपेक्षा अश्यात जिवन जगतांना अनेक अडिअडचणींना तोंड देत आपल्या जिवनाचा गाडा खेचण्यासाठी सततची धडपड*
*असाच प्रकार गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भामरागड तालुक्यातील लोहारी मार्गावरील मलमपोडुर येथून भुसेवाडा या गावाच्या मधोमध असलेल्या नाल्यावर नागरिकांनी पुढाकार घेत पुलाचे निर्माण करुण सदर नाव्यावरील रहदारीचा मार्ग निर्माण करूण एक आदर्श निर्माण केले*
*गडचिरोली जिल्हा हा जंगलांनी व्यापला असून आजपर्यंत शासनाचे दुर्लक्ष होत आहे भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम भागात भामरागड लाहेरी मार्गावर मलमपोडुर येथुन भुसेवाडा येथे जाण्यासाठी नाल्यातुन कंबर बरं पाण्यातुन जावे लागते त्यामुळे भुसेवाडा येथील नागरिकांनि एकत्र येऊन एक ईतिहास कालिन पुलिया बांधले हा पुलिया सर्वांचे लक्ष वेधून घेतले जात आहे हा पुलिया बाबु पासून तयार केलेली आहे हा एक अनोखा पुलिया तयार करण्यात आला आहे या बांधकामासाठी सचिव गोरे हे सहकार्य केले*
*या दुर्गम स्थानावरील नाल्याच्या पुलाचे बांधकाम करणाऱ्या सर्व स्वंयसेवी गावकरी,युवक युवती या सर्वांच्या अथक परिश्रमास महाराष्ट्र न्युज मीडियाच्या वतीने मानाचा मुजरा…*