Breaking News

*मोवाड नगरपरिषदेला पूर्ण कालीन मुख्याधिकारी द्या* *नागपूर जिल्हाधिकारी यांना निवेदन*

*मोवाड नगरपरिषदेला पूर्ण कालीन मुख्याधिकारी द्या*

*नागपूर जिल्हाधिकारी यांना निवेदन*

नरखेड तालुका प्रतिनिधि – श्रीकांत मालधुरे

नरखेड़ – दि.१९/१०/२० ला भारतीय जनता पार्टी मोवाड च्या वतीने मा.रवींद्र ठाकरे जिल्हाधिकारी नागपूर यांना मोवाड शहराला पूर्ण कालिन मुख्याधिकारी द्यावे या करिता मा.अरवींद्र गजबे(जिल्हा भाजपा अध्यक्ष),चरणसिंग ठाकूर(जिल्हा भाजपा उपाध्यक्ष),किशोर रेवतकर(जिल्हा संघटन महामंत्री),सुरेश खसारे(माजी नगराध्यक्ष न.प.मोवाड),भास्कर माळोदे(भाजप शहर अध्यक्ष मोवाड),मो.इस्माईल बारुदवाले(जिल्हा विशेष सदस्य),दिनेश पांडे(जिल्हा विशेष निमंत्रित सदस्य भाजपा)आदर्श पटले(भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष),अंकुश घावडे(भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष मोवाड), यांनी मोवाड शहराला भेटसावत आसले समस्या सोडवण्यासाठी निवेदन दिले.

जेव्हापासून मोवाड नगर परिषद मधील स्थानिक बॉडी डिजाल झाली आणि कर्तत्वदक्ष मुख्याधिकारी मेश्राम यांची कोरोना प्रदूर्भाव गावांमध्ये पाये पसरवत होता.अशावेळी अथक परीश्रम घेऊन मोवाड ला कोरोना मुक्त ठेवले होते.परंतु मेश्राम मुख्याधिकारी यांची बदली करण्यात आली .त्यानंतर मोवाड नगर परिषदेची जबाबदारी ही नरखेड चे मुख्याधिकारी प्रविण मानकर यांना अतिरिक्त दोन दिवसाचा चार्ज देण्यात आला .परंतु त्यांच्याकडे नगरपरिषद नरखेड मध्ये कामाचा खूप ताण असल्याने हे मोवाडला पूर्ण वेळ देऊ शकत नाही कारण मोवाडच्या विस्तार हा लोकसंख्याने जास्त आहे.यामुळे समस्या पण जास्त आहेत.आणि त्यामुळे या गावातील जनतेची निगडीत असलेली अनेक विकास कामाचे प्रोजेक्ट रखडले आहे. गावातील विकास कामे सुरू असुन त्याकडे नगरपरिषद प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे .कामे वेळेत होत नही आहे गावात केरकचरा साफ सफाई चा अभाव झालेला आहे .अनेक बाबी आहे यामुळे सर्वसामान्य माणूस ज्याला नगर परिषद मध्ये सर्वसाधारण कामासाठी खूप त्रास जात आहे. केंद्र शासनाची घरकुल योजना थंड्या बस्त्यात पडली आहे. ज्या लोकांनी घरकुल योजनेमध्ये घर बांधली आहे .त्यांना दुसऱ्या टप्प्याचा हप्ता अजून पर्यंत मिळालेला नाही त्यामुळे केंद्र शासनाची घर कुल योजनेच्या लाभार्थी अडचणीत आले आहे तसेच केंद्र सरकारची क्रिडा संकुलांची फाईल केंद्र शासनाकडे प्रलंबित पढलेली आहे त्याकडे कोणी लक्ष देणारे नाही असे अनेक अडचणीचा सामना जनतेला होत आहे क्षेत्रातील राज्यामध्ये गृहमंत्री आहे तरी सन्माननीय नामदार अनिल देशमुख साहेब यांनी जातीने लक्ष द्यावे अशी जनतेची मागणी आहे .आज गावाचा स्वच्छता अभियान योजना विकास कामी रखडलेली आहे तरी मोवाड न.प.चे रिक्त असलेली पदे मुख्य अधिकारी सोबत पाणीपुरवठा अभियंता बांधकाम अभियंता व इतर कर्मचाऱ्यांची रिक्त असलेली पदे त्वरित भरण्यात यावी अशी मागणी जिल्हा भाजपा विशेष निमंत्रित सदस्य ईस्माईल बारूवाले यांनी केली आहे.मोवाड गावकरी जनते कडून.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …