*भव्य रक्तदान शिबिर संपन्न*
*स्व. नरेश डोंगरे, स्व. धनंजय कळसकर व स्व. मनोज चौधरी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रक्तदान शिबिर आयोजन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर माळीपुरा येथे करण्यात आले*
विशेष प्रतिनिधि
कारंजा (घा. ):- नवदुर्गा उत्सव मंडळ वार्ड नंबर 7 माळीपुरा च्या वतीने स्व. नरेश डोंगरे, स्व. धनंजय कळसकर व स्व. मनोज चौधरी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रक्तदान शिबिर आयोजन आज दि. 21 ला विठ्ठल रुक्मिणी मंदिर माळीपुरा येथे करण्यात आले. रक्तदान शिबिर ला 47 युवकांनी रक्तदान केले आहे. कोरोणा विश्व महामारी च्या संकटात सुद्धा रक्तदान शिबिर सारखे आयोजन म्हणजे खरंच सामाजीक कार्यात खूप मोठे योगदान आहे हे नवदुर्गा उत्सव मंडळ ने स्पष्ट केले. रक्तदान हे श्रेष्ठदान आहे रक्तदानामुळे असंख्य रुग्णांना जीवनदान सुद्धा मिळते .
रक्तदान संकलन पेढी म्हणून रेनबो ब्लड अंड कंपोनेंट बँक रामदास पेठ नागपूर चे डॉ. रवी भांगे सिस्टर शहाणा ,शितल, स्वाती, कृष्णा, इन्द्रपाल, गणेश पटले यांनी काम पाहिले .नवदुर्गा उत्सव मंडळातर्फे रक्तदात्यांना मास्क, सॅनी टायझर व गिफ्ट चे वितरण करण्यात आले. दरवर्षी वेगवेगळी सामाजिक उपक्रम या मंडळांकडून होत असते.
Maharashtra News Media सच की आवाज