*मा.नितिन गडकरी यांच्या प्रयत्न सुरू झाली कीसान रेल्वे*

*नरखेड वरून निघालेली किसान रेल शेतकऱ्यांच्या हिताची*
नरखेड प्रतिनिधि श्रीकांत मालधुरे
नरखेड़ – संत्रा उत्पादकांना सरकारने वाहतूक खर्चात 50% सवलत देऊन व त्यांचा वेळ वाचवून शेतकऱ्यांच्या आनंदात भर पाडली.आज दिनांक 21/10 /2020 ला सायं 6.00 वा. नरखेड रेल्वे स्टेशन वरून “किसान स्पेशल रेल्वे मालगाडी” चा शुभारंभ झाला. *मा.ना.श्री.नितिनजी गडकरी साहेब ,केंद्रीय मंत्री भारत सरकार. मा.ना.श्री.अनिलबाबू देशमुख गृहमंत्री म.रा.मुंबई .व मा.श्री.कृपालजी तुमाने खासदार रामटेक लोकसभा यांच्या अथक प्रयत्नाने किसान रेल्वे संत्रा वाहतुक सुरू झाली.* रेल्वेने 17.5 मे.टन. संत्री 645 लाकडी पेटी मध्ये बंद करून दिल्ली (आदर्श नगर) येथे पाठविण्यात आली. सदर मालगाडी सजविण्यात आली होती. ही रेल्वे यानंतर दर बुधवारी नरखेड ते दिल्ली जाणार असल्याने परिसरातील शेतकऱ्यांची *फळे व भाजीपाला नरखेडमधून थेट दिल्ली पोहोचणार असल्याने शेतकऱ्यांना याचा चांगला फायदा होणार आहे असे सभापती बबनराव लोहे म्हणाले.*
शुभारंभाला मा. श्री.बबनरावजी लोहे सभापती कृ.ऊ.बा.स.नरखेड. श्री.संदीप बालपांडे, श्री.रवि वैद्य, श्री.रितेश हेलोंडे, श्री.सुरेश तातोडे ,श्री.सतिश येवले, रेल्वे अधिकारी व नरखेड कृ.ऊ. बाजारसमितीचे कर्मचारीवर्ग व शेतकरी मंडळी तसेच पञकार हजर होते.
Maharashtra News Media सच की आवाज