Breaking News

*कर्मयोगी फाऊंडेशन चा उपक्रम* *बोलते नव्हे तर कर्ते व्हा…* *माझ्या ताईला साडी*

*कर्मयोगी फाऊंडेशन चा उपक्रम*

*बोलते नव्हे तर कर्ते व्हा…*

*माझ्या ताईला साडी*

*विशेष प्रतिनिधी हिंगणा*

हिंगणा / नागपुर – जित्याजागत्या देवीला साडी देऊया देवीच्या चेहऱ्यावर हास्य फुलवूया .. नवरात्राचा पाचवा दिवस : – २० ताईंना साडी वाटप कर्मयोगी फाऊंडेशन च्या वतीने नवरात्र उत्सवाच्य पार्श्र्वभूमीवर विधवा , गोरगरीब व गरजवंत अशा १२५ ताईंना साडीचोळी देऊन त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणार आहे . या उपक्रमाच्या पाचव्या दिवसाच्या मानकरी असणाऱ्या
१ ) हळदगाव २ ) आंजनगाव ३ ) गुमगाव ४ ) बुटीबोरी या गावच्या जित्याजागत्या देवींना दिनांक २१/१०/२० रोज बुधवारला साडीचोळी देऊन त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यात आले.
गुमगाव येथे आयोजित या कार्यक्रमात कुसुम धवलनल, सोनाबाई मडावी, सीताबाई माकोड़े, लक्ष्मी माकोड़े, कमलाबाई मोहरले यांना नउवारी पातळ तसेच भागेरमा हेड़ाऊ, विमल कुंभारे, निर्मला लोनबैले, कुंदा दुर्गे यांना साडी वितरित करण्यात आली.
यावेळी सूत्रसंचालन सौ. प्रविणा ठाकरे यांनी तर प्रस्तावना नाशिर शेख़ यांनी केले. कार्यक्रमाची अध्यक्षता पंकज ठाकरे यांनी केली. यावेळी गुमगाव सरपंच उषा बावने, उपसरपंच नित्यानंद बोडने, पं. स. सदस्या शोभा आष्टनकर, सचिव गजानन माहुलकर, प्रा. पियूष पोकळे, जेष्ठ पत्रकार भाई सिरसाट प्रामुख्याने उपस्थित होते.

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …