*ग्रामपंचायत पाणीपुरवठा घरगुती नळ जोडणी च्या निविदा प्रक्रियेला तात्काळ स्थगिती देण्याबाबत*

*आमदार डॉक्टर देवरावजी होळी*
*४ दिवसात घाईने राबवण्यात येणाऱ्या प्रक्रियेची चौकशी करून नव्याने प्रक्रिया राबविण्यात यावी*
गडचिरोली प्रतिनिधि – सूरज कुकुडकर
गडचिरोली – जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिनांक ८ ऑक्टोबर २०२० रोजी ग्रामपंचायत पाणीपुरवठा योजनेअंतर्गत १०० % टक्के कार्यात्मक घरगुती नळ जोड़नी करण्याकरिता ४ दिवसात प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत ही प्रक्रिया अत्यंत घाई गडबडीने करण्यात येत असून यात गैरप्रकार असल्याचे दिसून येत असल्याने या प्रक्रियेस तात्काळ स्थगिती देण्यात यावी अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ देवरावजी होळी यांनी केली आहे.
सदर निविदा प्रक्रिया राबविताना दिनांक ८ ऑक्टोबरला सुचना देवून दिनांक 12 ऑक्टोबरला निविदा प्रक्रिया राबविण्याची घाई करणे संशयास्पद आहे. या निविदा प्रक्रिये करीता जिल्हा परिषदेची मंजुरी घेण्यात आली नाही. मंजुरी न घेताच निविदा प्रक्रिया राबविणे योग्य नाही. या कामाकरता लागणारा निधी उपलब्ध नसतानाही व संबंधित खात्यात पैसे नसतानाही निविदा प्रक्रिया कोणत्या आधारावर राबविण्यात आली याची चौकशी होणे आवश्यक आहे. या कामाकरीता लागणाऱ्या अनुभवाची अट विशेष लोकांना काम मिळवून देण्याच्या हेतूने असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सदर प्रकरणात गैरप्रकार होत असल्याचे निदर्शनास येत असल्याने सदर प्रक्रियेला तातडीने स्थगिती देण्यात यावी व सदर प्रकरणाची चौकशी करून नव्याने निविदा प्रक्रिया घेण्यात यावी अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केली आहे.
Maharashtra News Media सच की आवाज