Breaking News

*आवारपूर अल्ट्राटेक फाऊंडेशन व्दारे नोटबुक चे वितरण*

*आवारपूर अल्ट्राटेक फाऊंडेशन व्दारे नोटबुक चे वितरण*

कोरपना प्रतिनिधि – गौतम धोटे

कोरपना :- आजच्या युगात शिक्षण हा महत्त्वाचा आधारस्तंभ असून, प्रत्येक व्यक्ती ही साक्षर झाली पाहिजेत हे लक्षात घेता नेहमी सातत्याने पुढाकार घेत असलेल्या अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेअर फाऊंडेशने यंदा ही मुलांच्या शिक्षणाला महत्त्व दिले असून कोरोनामुळे हालाकीची परिस्थिती असतानाही, आवारपूर, बिबी, नांदा, नोकारी, पालगाव,राजुरगुडा, कोल्हापूरगुडा, तळोधी, बाखर्डी, भोयगाव, हिरापूर, व तसेच सांगोडा अशा एकूण बारा गावांतील जिल्हा परिषद शाळेतील पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना नोटबुक वितरणाचा शुभारंभ करण्यात आला आहे. व त्या अनुषंगाने, येथील कोरोनाच्या सर्व नियमाचे पालन करून श्री विजय एकरे, युनिट हेड,
अल्ट्राटेक सिमेंट कंपनी आवारपूर यांच्या शुभ हस्ते, नोटबुक वितरणाचे अनावरण करण्यात आले . कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे म्हणून फंक्शन हेड,मा. अनिल पिल्लर्ई, मा.बि.पी.सग्गु, मा. योगेश भट, मा. बाबु रायली, संजय पेठकर, सतीष मिश्रा व सचिन गोवारदीपे उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात विजय एकरे यांनी म्हटले की, शिक्षण हा मुलभूत पाया असुन कुठलीही परिस्थिती असो प्रत्येकाचे सहकार्य गरजेचे आहे. जिल्हा परिषद शाळेतील मुलांचा भौतिक विकास होऊन त्यांना विविध सुविधा प्रदान करण्या करिता सर्व सहकार्य अपेक्षित आहे. अल्ट्राटेक फाऊंडेशन व्दारे योग्य ते सहकार्य वेळोवेळी करण्यात येईल असे प्रतिपादन केले. यानंतर वरील बारा गावातील जिल्हा परिषद शाळेतील , एकूण 538 विध्यार्थांना अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेअर फाऊंडेशन व्दारे नोटबुक वितरण करण्यात येणार आहे .

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …