*मागासवर्गीय कर्मचाऱ्यांवर जातीय द्वेषातून कार्यवाही करणारे महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री. संजय वैद्य यांची बदली न करून संघटनेस न्याय न दिल्याने मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेतर्फे आंदोलन*
विशेष प्रतिनिधि
चंद्रपुर – महावितरण बल्लारशाहा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री संजय वैद्य यांनी नियमबाह्य पद्धतीनेअनुसूचित जातीच्या ४ कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ केलेले आहे .
अनुसूचित जातीच्या कर्मचाऱ्यांसोबत ते अतीशय उर्मटपणे वागतात आणि खालच्या दर्जाच्या भाषेचा वापर करतात. काही अनुसूचित जातीच्या कर्मचाऱ्यांना आपल्या केबिन मध्ये बोलाऊन श्री संजय वैद्य यांनी त्यांच्या जातीची विचारणा केली आहे.रुजू झाल्याच्या पाहल्याच दिवशी संविधान बचाव आंदोलनाच्या कार्यकर्त्यासोबत अतिशय तुच्छपणे वागले, मी संविधानाला आणि आंबेडकर यांना मनात नाही असे बोलले.त्यामुळे अनुसूचित जातीचे कर्मचारी यांच्यात असून असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.या सर्व घटनांमुळे मागासवर्गीय संघटनेने त्याची तक्रार मुख्य अभियंता महावितरण चंद्रपूर परिमंडळ यांचेकडे केली परंतु प्रशासनाने थातूर मातूर चौकशी केली. मागासवर्गीय संघटनेने श्री वैद्य यांचे गंभीर गुन्हे निदर्शनास आणून देऊन देखील सुद्धा एवढ्या गंभीर गुन्ह्यातून श्री वैद्य याना दोषमुक्त करण्याचेमनसुबे आखून श्री वैद्य यांची प्रशासन पाठराखण करीत असल्याचे संघटनेच्या निदर्शनास आले.
त्यामुळे दिनांक ०९ अक्टोबर २०२० ला आंदोलन करणेबाबत अंतिम इशारा संघटनेने प्रशासनास दिला होता. परंतु अद्यापही त्याची दखल प्रशासनाने न घेतल्यामुळे व जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने मागासवर्गीय संघटन क्रमबद्ध पद्धतीने दिनांक २१ आक्टोबर २०२० पासून आंदोलनास सुरवात करणार असल्याचे एका पत्राद्वारे कळविलेले आहे.
चंद्रपूर शहर काँग्रेस अनुसूचित जाती विभागद्वारे पाठिंबा दिला व त्यांच्यावर कार्यवाही न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल.
Maharashtra News Media सच की आवाज