Breaking News

*धनदीप संस्थेच्या वतीने नवरात्री निमित्त श्रुंगारीक साहित्य वाटप*

*धनदीप संस्थेच्या वतीने नवरात्री निमित्त श्रुंगारीक साहित्य वाटप*

मौदा विशेष प्रतिनिधि

मौदा : नवरात्री च्या पावन पर्वावर भवानी शक्ती माता मंदीर देवमुंढरी येथे नवरात्री निमित्त नाशिक येथील धनदीप संस्थेच्या अध्यक्षा सौ .यमुना अवकाळे यांच्या वतीने अखिल पत्रकार कल्याण बहुउद्देशीय संस्था नागपूर जिल्हाध्यक्ष तुषार कुंजेकर यांच्या हस्ते
सुमारे 20-25 मुलींना रजिस्टर, पेन, रुमाल, मेहंदी कोन, व फळाचे वाटप करण्यात आले.

धनदीप बहुउद्देशीय संस्था ही गेल्या चार वर्षा पासून गरीब व गरजू मुला मुलींना तसेच गरीब गरजू कुटुंबांना नेहमीच सहकार्याची भावना जोपासून काम करीत असते.ही संस्था राज्य पातळीवर काम करीत असून प्रत्येक जिल्ह्यात संस्थेची काही न काही मदत नेहमीच दिसून येते. सदर कार्यक्रमाला उपस्थित अखिल पत्रकार कल्याण बहूद्देशिय संस्था नागपूर जिल्हाध्यक्ष तुषार कुंजेकर, मंगेश तलमले(पत्रकार),राजकुमार ठवकर (माजी पं.स सभापती ),राकेश बागडे ग्रा.पं.सदस्य खात, अविनाश तलमले, शैलेश गिर्हेपुंजे, गणेश धांडे, नंदू लांडगे, बाबूलाल धुर्वे, परिहार शिक्षिका(जि.प.शाळा देवमुंढरी),मिनाक्षी धुर्वे उपस्थित होते.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …