Breaking News

*वरोरा शहरातील चिल्लर भाजीपाला विक्रेत्यांची नगर परिषदेला धडक*

*वरोरा शहरातील चिल्लर भाजीपाला विक्रेत्यांची नगर परिषदेला धडक*

वरोरा प्रतिनिधी – जुबेर शेख

वरोरा – शहरातील गांधी चौक ते कर्मवीर शाळा या रस्त्याने होणारी चिल्लर भाजी विक्री हटवून नगर परिषद वरोरा ने बांधून दिलेल्या ओट्यावरून विक्री करावी यासाठी वरोरा नगर परिषद कडून सांगण्यात येत आहे.परंतु मुख्य बाजार मंडी जवळच असल्याने ठोक व्यापारी देखील चिल्लर भाजीपाला विक्री करीत असल्याने आमच्याकडून कोणीच भाजीपाला खरेदी करीत नाही असे चिल्लर भाजीपाला विक्रेत्यांचा आरोप आहे.

नगर परिषदेने बनवून दिलेल्या ओट्यावरून आम्ही भाजीपाला विक्री करतो पण त्याआधी सकाळी 10 ला थोक भाजीपाला व्यापाऱ्यांची दुकाने बंद करा. किंवा ठोक भाजी मंडी बाजार समिती वरोरा येथे हलवा असे चिल्लत भाजीविक्रेते यांचे म्हणणे आहे.

ओट्यावर भाजी विक्री करण्यासाठी नगर परिषद वरोरा च्या कर्मचाऱ्यांकडून अश्लिल शिवीगाळ होत असल्याचे चिल्लर भाजी विक्रेत्यांनी आमच्या स्थानिक प्रतिनिधीला सांगितले.नगर परिषद उपाध्यक्ष अनिल भाऊ झोटिंग यांनी संवाद साधत आज दुपारी मुख्याधिकारी नगर परिषद वरोरा यांच्याशी चर्चा करून मार्ग काढू असे सांगत आज दुपारी बैठक बोलावली आहे.सदर बैठकीत चिल्लर भाजी विक्रेते यांचे प्रश्न मार्गी लागतात का…? याकडे वरोरा वासीयांचे लक्ष वेधले आहे.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …