Breaking News

*महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने स्थानिक कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील कंपनी वर दिली धडक*

*महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने स्थानिक कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील कंपनी वर दिली धडक*

वरोरा प्रतिनिधी – जुबेर शेख
चंद्रपूर – जिल्ह्यातील कंपनी मध्ये स्थानिकाना रोजगार देण्यात यावा यासाठी अधिकारी वर्ग याना वारंवार निवेदन देण्यात आले होते परंतु कंपनी कडुन कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.महाराष्ट्रातील कोणत्याही भागात असलेल्या कंपनी मध्ये ८०% स्थानिक कामगारांना काम देण्याचा (जी आर)असताना देखील काही कंपनीने परप्रांतीय कामगारांचा कामावर भरना केला आहे .त्यामुळे स्थानिक सुशिक्षित युवक मात्र बेरोजगार झाले आहेत.याच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे आज २६ ऑक्टोबर २०२० रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील कंपनी वर स्थानिकांना न्याय देण्या साठी धडक दिली.
या धडक आंदोलनाचे नेतृत्व चंद्रपूर चे मनसे शहर अध्यक्ष मनदीपभाऊ रोडे यांनी केले सोबत मनवीसे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत जुंजारे , मनवीसे तालुका अध्यक्ष वरोरा गौरव मेले,सुमित करपे शहर सचिव मनसे चंद्रपूर,सौ.संगीताताई धात्रक महिला सेना शाखा अध्यक्ष चंद्रपूर , नितीन बावणे मनसैनिक आदी उपस्थित होते .

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …