*कट्टा येथे करंट लागून एका इसमाचा मृत्यू*
देवलापार प्रतिनिधी-पुरुषोत्तम डडमल
देवलापार :- स्थानिक पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या २किमी अंतरावरील कट्टा येथील शेतातील बांधावर विद्युत करंट लागून महेश वरठी रा. कट्टा या इसमाला करंट लागल्याने घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना काल रविवार ला दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली.
प्राप्त माहिती नुसार कट्टा येथीलझाडू झिंगुजी वरठी यांनीआपल्या शेतातील बांधीमध्ये विद्युत खांबावरू सेन्ट्रीग ताराचे विद्युत करंट लावल्याने कट्टा येथील महेश मयाराम वरठी(४०) याचा त्या सेन्ट्रीग तारेला स्पर्श झाल्याने करंट लागून खाली पडून घटनास्थळीच मृत्यू पावला.
महेश व रंजीत वरठी दोघेही शेतातील धान राखणीला गेले होते. दुपारी१वाजताच्या सुमारास घरी परत येत असतांना झाडू झिंगु वरठी याच्या शेतातील बांधीत करंट असलेल्या सेन्ट्रीग तारेला महेशचा स्पर्श झाल्याने घटनास्थळीच पडून मृत्यू झाला.
या प्रकरणी पोलिसांनी कलम ३०४ भादवी नुसार गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे.
घटनेचा पुढील तपास देवलापारचे ठाणेदार प्रवीण बोरकुटे करीत आहे.