Breaking News

*घट विसर्जनाला गेला अन जीव गमावून बसला* *न्यु तोतलाडोह येथील घटना* *दसऱ्याच्या दिवशी घडलेल्या घटनेचे गावात शोककळा*

*घट विसर्जनाला गेला अन जीव गमावून बसला*


*न्यु तोतलाडोह येथील घटना*

*दसऱ्याच्या दिवशी घडलेल्या घटनेचे गावात शोककळा*

देवलापार प्रतिनिधी-पुरुषोत्तम डडमल

देवलापार –येथून जवळच असलेल्या स्थानिक पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या न्यु तोतलाडोह येथे काल रविवार ला २५ ऑक्टोबर रोजी दुपारी २:३० ते ३ वाजताच्या दरम्यान गावातील मंडळी व काही मुले गावातच मध्यभागी असलेल्या तलावात घट विसर्जन करण्यासाठी गेले होते.घट विसर्जन करून गावकरी घरी परत गेले परंतू काही मुले तेथेच अंघोळ करण्यासाठी थांबले होते.त्यात सुभाष ही होता.सुभाष ने ही अंगातील कपडे काढून तलावातील पाण्यात अंघोळी करीता उतरला असता दहा ते पंधरा फूट खोल पाण्यात शिरल्याने सुभाष किसना मडावी(१५) हा तलावात बुडाला.असे काही प्रत्यदर्शीने सांगितले सुभाष बुडल्याचे माहीत होताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेवून त्याला पाण्याबाहेर काढून उपचारार्थ देवलापार येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासून मृत्यू झाल्याचे घोषित केले.दसऱ्याच्या दिवशी घडलेल्या घटनेमुळे गावात शोककळा पसरली होती.
सदर घटनेचा देवलापार पोलिसांनी मर्ग दाखल करून या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …