Breaking News

*तुडतुडा रोगाने नुकसानग्रस्त धान उत्पादक शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार नुकसान भरपाई द्या- भाजपा ग्राम विकास आघाडी जिल्हा अध्यक्ष डॉक्टर राजेश ठाकरे यांची मागणी*

*तुडतुडा रोगाने नुकसानग्रस्त धान उत्पादक शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार नुकसान भरपाई द्या- भाजपा ग्राम विकास आघाडी जिल्हा अध्यक्ष डॉक्टर राजेश ठाकरे यांची मागणी*

रामटेक प्रतिनिधी – ललित कनोजे
रामटेक – यावर्षी खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे पडलेला धान तसेच नैसर्गिक निर्माण झालेले तुडतुडा रोग यामुळे शेतकऱ्यांचे सरासरी 80 टक्के नुकसान झालेले आहे तरीसुद्धा जिल्हा कृषी व महसूल प्रशासन व तहसील प्रशासन निद्रा अवस्थेमध्ये शेतकऱ्यांच्या हाल पहात आहेत नुकसान भरपाईची विचारणा केली असता शासकीय नियमाची अडचण हे शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता आडवी येत असल्याचे कारण समोर करत वेळ काढू शब्दप्रयोग करून शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळ चालू आहे.
तुळतुळा या रोगाने नुकसान झालेल्या शेतावर दौरा करण्याकरिता रामटेक तालुका कृषी अधिकारी श्री माने साहेब यांच्यासह नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करण्यात आली .


निवेदन नमूद केल्याप्रमाणे रामटेक मौदा पारशिवनी परिसरात तुडतुडा रोगाने परत दुसरा अटॅक जोरदार चढवलेला आहे त्यामुळे धान पिकाचा शेतकरी अजूनच मोठ्या अडचणीत असलेला आहे एका बाजूला अतिवृष्टीने जमिनीवर पडलेला धान त्यात 20 टक्के धान सडलेला आहे . 5 टक्के काही धान लोंबा सहित जमिनीवरच वापलेला आहे . तसेच तुळतुळा या रोगामुळे सरासरी 30 टक्के धान तनस झालेला आहे आणि बरेच धान कापणी वर आल्याकारणाने तसेच तुळतुळा रोगा चे रोजचे आक्रमण प्रमाण वाढत चालल्याने शेतकऱ्यांनी कापणीला सुरुवात सुद्धा केलेली आहे त्यामुळे 25 टक्के धान पोचट झालेला असणार आहे म्हणजे दाणा परिपूर्ण भरलेला नसणार आहे अशा वेळेस शेतकऱ्यांचे सरासरी 80 टक्के धान पिकाचे नुकसान झालेले आहे काही शेतकऱ्यांनी धान पिकावर ट्रॅक्टर चालवून धानाची मोड केलेली आहे त्या ठिकाणी गहू पेरणी याकरिता जमिनीची मशागत सुद्धा चालू केलेली आहे एवढे असताना सुद्धा शासनाचे विविध नियम शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता आडवे येत आहेत विमा कंपनीच्या सुद्धा फायदा शेतकऱ्यांना कितपत होईल याचीसुद्धा प्रश्नचिन्ह अनेक फालतू निकषामुळे निर्माण झालेले आहेत त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे तेव्हा सर्व पक्षाच्या राजकीय मंडळींनी सरकारवर व प्रशासनावर दबाव बनवून शेतकऱ्यांना तुडतुडा रोगाच्या नैसर्गिक आक्रमणामुळे झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई मिळवून देण्याकरिता तसेच विमा कंपनीच्या लाभ मिळण्याकरीता आडवे येणारे सर्व निकष काढून टाकण्याकरिता राज्य सरकारकडे पाठपुरावा करावा अशाप्रकारे आवाहन सुद्धा डॉक्टर राजेश ठाकरे यांनी केलेले आहे तसेच राज्य सरकारने धान उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी रहावे अशा एका आशयाचे निवेदन माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना जिल्हाधिकारी मार्फत दिलेल्या आहे.

कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मार्फत तुळतुळा रोगाच्या नियंत्रणाचे करिता वेळेत आवश्यक उपाययोजना न झाल्याने तुळतुळा रोग नियंत्रणात आलेला नाही शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करणारे यंत्रणाच्या अभावी कृषी सेवा केंद्र धारकाच्या माध्यमातून दिल्या गेलेल्या विविध फवारणीच्या औषधातून शेतकऱ्यांना काहीही फायदा झालेला नाही त्यात शेतकऱ्यांच्या चार ते पाच फवारणीचे खर्च वाया गेले त्यामुळे तुडतुडा रोगावर सहा ते सात हजार रुपये प्रति एकर एवढा फवारणीचा खर्च वाया गेला त्यामुळे नैसर्गिक आपत्तीने खरीप हंगामातील शेतकरी अतिवृष्टीमुळे व तुळतुळा या दोन्ही गोष्टीमुळे धान पिक उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे अजून पर्यंत तुडतुडा या रोगा करिता पंचनाम्याचे कुठलेही आदेश नाहीत याला कारण कृषी विभाग आहे तेव्हा तुडतुडा हा रोग संदर्भात कीड-रोग नैसर्गिक आपत्ती या शीर्षकाखाली राज्य शासनाने सरसकट मदत करावी.

नैसर्गिक आपत्तीमुळे दरवर्षी होणारे नुकसान विमा कंपनीकडून मिळत नसल्याने तसेच राज्य शासनाच्या वतीने व केंद्र शासनाच्या वतीने सुद्धा मिळत नसल्याने शेतकरी विम्यापासून दूर जात आहे तेव्हा विम्याचा फायदा शेतकऱ्यांना भेटावा तसेच शेतकरी विमा कडे आकर्षित व्हावे व त्यांचे पिक संरक्षित असावे याकरिता शेतकऱ्यांच्या खालील प्रमाणे मागण्या आहेत.

1. ज्या अर्थी शेतकरी निहाय पिक विमा हप्ता घेतल्या जातो त्या धर्तीवर शेतकऱ्यांना शेतकरी निहाय अर्थात नुकसानग्रस्त शेती पिक निहाय त्याला विम्याचा लाभ व्हावा अशा प्रकारची तरतूद विमा पॉलिसी मध्ये असावी नुकसान होऊ नये काही निकष जे नुकसान भरपाई करता आडवे येत आहेत त्यांना काढून टाकण्यात यावे.
2. नुकसान भरपाई ची जुनी अट हे शितील करण्यात यावी यामुळे खरे नुकसान ग्रस्त शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित राहत आहेत त्यामुळे राज्य सरकार व केंद्र सरकार यांनी एक समिती नेमून विमा कंपनी , SDRF राज्य सरकार व NDRF केंद्र सरकार द्वारे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत भेटावे याकरिता जुने सर्व निकष काढून घ्यावे व सर्वे निहाय अर्थात शेतकरी निहाय म्हणजेच नुकसानग्रस्त पीक शेत निहाय नुकसान भरपाई भेटावी याकरिता तरतूद करणे अत्यंत गरजेचे आहे. हीच काळाची गरज आहे तेव्हाच शेतकरी सुरक्षित व संरक्षित असेल तसेच सर्व शेतकऱ्यांनी तुळतुळा रोगाचे निरीक्षण करण्याकरिता आपल्या भागाचे दैनंदिन फिल्डवर काम करणारे कृषी विभागाचे कृषी सहायक यांना आवर्जून फोन करून त्यांच्यासोबत उपस्थित राहून तुडतुडा रोगाने नुकसानग्रस्त शेतीचे फोटो घ्यावे व गावागावातील शेतकऱ्यांनी सर्वे निहाय शेत पीक निहाय नुकसान भरपाई भेटावी या मागणीकरिता तसेच सरकारचे व प्रशासनाचे लक्षवेध देण्याकरिता जिल्ह्यात सर्वत्र कृषी कार्यालयावर मोर्चे न्यावे असेसुद्धा आवाहन शेतकऱ्यांकरिता डॉक्टर राजेश ठाकरे यांनी केले.

रामटेक मौदा पारशिवनी याभागात धान उत्पादक शेतकऱ्यांकरिता स्थानिक आमदार व खासदार शांत बसलेले आहेत त्यांचे अजून पर्यंत शासनाला कोणतेही निवेदन नाही किंवा पत्रसुद्धा नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष पसरलेला आहे .त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितार्थ स्थानिक आमदार व खासदारांनी सभागृहात प्रश्न उचलावा तसेच संबंधित मंत्रिमंडळात सोबत चर्चा करून या खरीप हंगामामध्ये अतिवृष्टीने झालेले नुकसान तसेच नैसर्गिक तुडतुडा रोग या मुळे झालेले नुकसानाची सरकार कडून सरसकट भरपाई मिळण्याकरिता यांनी प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे आहे तेव्हाच यांना शेतकऱ्यांनी मत देऊन निवडून आणले याचे सार्थक होईल -डॉक्टर राजेश ठाकरे जिल्हा अध्यक्ष भाजपा ग्राम विकास आघाडी.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …