*शेततळ्यात बुडून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू*
*नवेगाव(बेलदा)येथील घटना*
देवलापार प्रतिनिधी -पुरुषोत्तम डडमल
देवलापार :- स्थानिक पोलीस स्टेशन हद्दीतील ९ किमी अंतरावरील नवेगाव(बेलदा)येथील तरुण शेतकरी महेंद्र भोजराज भड (३०) हा सकाळी ९ वाजताच्या सुमारास धान बांधण्याकरिता शेतात गेला होता.त्याचा शेतातील शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज मंगळवार ला सकाळी ११वाजताच्या दरम्यान उघडकीस आली.
प्राप्त माहिती नुसार आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास महेंद्र भोजराज भड हा शेतात धान बांधण्याकरिता गेला होता.त्यानंतर सकाळी ११वाजताचे दरम्यान त्याचा भाऊ व वडील शेतात काम करायाला गेले.परंतू महेंद्र शेतात दिसून आला नाही.दोघांनी आजूबाजूला शोधाशोध करीत असतांना शेताजवळील शेततळ्या जवळ महेंद्रची चप्पल दिसून आली परंतू महेंद्र काही दिसला नाही. शेवटी घरच्यांनी याची माहिती देवलापार पोलीस स्टेशनला दिली. ठाणेदार प्रवीण बोरकुटे यांनी तात्काळ पोलीस स्टाफ नवेगाव येथे घटनास्थळी पाठविला.पोलिसांनी ही महेंद्र चा चोहोबाजुनी शोध घेतला पण आढळून आला नाही. त्यामुळे तो पाण्यात बुडल्याची शंका पोलिसांना आल्याने त्यांनी काही मासेमाऱ्यांना घटनास्थळी बोलावून शेततळ्यात महेंद्र चा शोध घेतला असता त्याचा मृतदेह पाण्यात तळाशी आढळून आला.मृतदेह पाण्याबाहेर काढून ग्रामीण रुग्णालय देवलापार येथे आणण्यात आले.मृतदेह तपासून डॉक्टरांनी मृत्यू झाल्याची घोषणा केली.
मृतकाचे मरणाचे निश्चित कारण जाणून घेण्यासाठी मृतकाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून सदर प्रकरणात पोलिसांनी मर्ग दाखल केला.
या प्रकरणी पुढील तपास ठाणेदार प्रवीण बोरकुटे करीत आहे.
Maharashtra News Media सच की आवाज