*मोवाड येथे कृषी सहाय्यक व ग्राम आधिकारी यांच्या बदली निमित्त सत्कार*

*मोवाड फाउंडेशन तर्फे केला सत्कार*
नरखेड प्रतिनिधी श्रीकांत मालधुरे
मोवाड – कृषी सहाय्यक मनोज भाकरे व ग्राम आधिकारी देवेंद्र नाखले यांचा सत्कार .मोवाड शहरातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणारे कृषी सहाय्यक मनोज भाकरे यांची मोवाड वरून शे.घाट येथे प्रशासकीय बदली झाली. तसेच मोवाड येथील ग्राम आधिकारी देवेंद्र नाखले यांची मोवाड येथून भिष्णूर येथे प्रशासकीय बदली झाली. अशा कर्तव्य निष्ठा प्रमाणिक जनतेची सेवा जबाबदारी ने करणाऱ्या आधिकारऱ्याचा मोवाड फाउंडेशन व संत्रा उत्पादक शेतकरी गटाच्या वतीने सत्कार करण्यात आला. मोवाड शहरात संत्रा उत्पादन करणारे शेतकरी मोठ्या प्रमाणात आहे. त्यासाठी त्यांना लागणाऱ्या अनेक नवीन कूषीच्या सरकारी उपाययोजना साठी सातत्याने मदत केली. मोवाड शहर जल मय व्हावेत यासाठी मोवाड शहरातील चार युवक हर्षल ढोरे,श्रीकांत मालधुरे,धिरज देवघरे, मिलिंद वाडबुद्धे यांना पाणी फाँडेशन च्या प्रशिक्षण करीता ५ दिवसा करीता पाठविण्यात आले की जेणे करून पाण्याचे नियोजन हे कशा प्रकारे करावे याची माहिती ही मिळावीत व ही माहिती मोवाड गावातील लोकांना सांगितली जावी यासाठी या चार तरुणाच्या उद्देश होता की मोवाड शहर जलमय करावेत व येशील शेतकरी हा गेले अनेक दिवसा पासून आपला लाखो रुपये बोरमधे व्यर्थ वाया घालत होता .नंतर असे निदर्शनास आले की ज्या वार्धनदीने मारले तीच आज तारणा मग ठरले कि एकुन १२ नदी डोहा पैकी सर्वाप्रथम माता माय मंदिर जवळचा डोह खोली करण कराच्या त्याची सुरवात पण झाली रामनवमीच्या शुभमुहूर्तावर ही घटना मोवाडसाठी ईतिहास नोद करणे समान आहे.येथील काम अनेक दिवस चांगले पद्धतीने पुर्ण झाले नंतर काही दिवसाने मोवाड शहरातील अतिशय महत्त्वाचा असलेला निमकर च्या डोह म्हणून ज्याची ओढख आहे.या वर्धानदी डोहाचे काम कडक उन्हाळ्यात मे महीनेत सकाळी ६ वाजता ला सुरू व्हाचे तर सायंकाळी ६ पर्यत चालायचे १२ तास येथे मोवाड शहरातील कामवर लक्ष ठेवणे साठी योगेश कनिरे हा पगारी सुपवायझर व जलमित्र श्रीकांत मालधुरे यांने निशुल्क एक ही पैसा न घेता सेवा दिली .तसेच या निमकर डोह च्या खोली करणा मुळे बोरखडी भागातील शेतकरी हा आज पाण्याणे समस्या पासून मुक्त झाला आहे. व मोवाड गावपण त्यासाठी सातत्याने प्रयत्न करून मोवाड शहरातील खोलीकरणाच्या कामात भाकरे व नाखले यांनी मोलाची मदत केली .
मोवाड शहर हे जलयुक्त शिवार योजनेत आणून मोवाड शहरात शासनाच्या मदतीने सिमेंट बंधारे व प्लग बंधारे मजूर करून दिले. आशा अनेक येजोना शेतकऱ्यांना मिळवून दिलेल्यात या कार्यक्रमाचे अध्यक्ष रमेश खसारे होते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुने म्हणून मंडळ अधिकारी लांडे साहेब , कृषी सहाय्यक रामटेके साहेब , रमेश राजगूरु , धनराज देवघरे,मोतीराम गजभिये हे होते .यावेळी पंतजिल माती परीक्षण प्रशिक्षक श्रीकांत मालधुरे , विनोद सोरते , हिराचंद कडू , रवि माळोदे , हरिष ढोरे , जितेंद्र वैद्य , दिनेश पांडे , संदिप पालीवाल , मंगेश नासरे , पुरूषोत्तम बागडे , वासुदेव बनाईत ,विवेक लिखार , ज्ञानेश्वर अकर्ते , अंकुश घावडे , पंकज देवघरे , जितू चौहान , वसंतराव वैघ,भाष्कर येवले ,ओमप्रकाश निमकर ,हर्षल ढोरे ,भुषण मालधुरे,विवेक लिखार सह शेकडो शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन यश चाळीसगावर तर आभार ललित खंडेलवाल यांनी मानले.
Maharashtra News Media सच की आवाज