Breaking News

*गोटूल भूमीच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध* *खासदार अशोक नेते यांचे प्रतिपादन* *गोटूल भूमीत विजयादशमीनिमित्त कार्यक्रम*

*गोटूल भूमीच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध*

*खासदार अशोक नेते यांचे प्रतिपादन*

 

*गोटूल भूमीत विजयादशमीनिमित्त कार्यक्रम*

गडचिरोली प्रतिनिधि – सूरज कुकुडकर

गढ़चिरोली – जिल्ह्यातील आदिवासी बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या गोटूल भूमीत गेल्या 25-30 वर्षांपासून विजयादशमीच्या दिवशी मोठा उत्सव साजरा करण्यात येतो व आदिवासी देवतांची पूजा-अर्चा केली जाते. याठिकाणी मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव एकत्र येऊन कार्यक्रमात सहभागी होतात मात्र येथे सोयी- सुविधांचा अभाव असून येथे येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी कोणतीही व्यवस्था नाही. त्यासाठी आपण गोटूल च्या विकासासाठी राज्य व केंद्र शासनाकडून निधी मंजूर करणार असून या गोटूल च्या सर्वांगिण विकासासाठी कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन भाजपचे अनुसूचित जमाती मोर्चा चे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी केले.

गडचिरोली लगतच्या चांदाळा मार्गावरील गोटूल भूमीत विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर दि. 25 ऑक्टोबर रोजी पूजा -अर्चा करून ध्वजारोहण करण्यात आले यावेळी समाज बांधवांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

कार्यक्रमाला खासदार अशोक नेते, गडचिरोली विधानसभेचे आमदार डॉ देवरावजी होळी, माजी आमदार डॉ नामदेवजी उसेंडी, भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा चे प्रदेश संघटन महामंत्री प्रकाशजी गेडाम, जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर, जिपचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कुतीरकर, आदिवासी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष नंदुभाऊ नरोटे, नाजूकराव पुराम, गावड साहेब, शिक्षण विभागाचे कोडाप व आदिवासी विद्यार्थी संघाचे पदाधिकारी, सदस्य व आदिवासी समाज बांधव उपस्थित होते.

यावेळी सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आदिवासी देव- देवतांची पूजा करून तदनंतर खासदार अशोक नेते यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

दरवषी येथे आदिवासी मेळावा व विविध कार्यक्रम घेतल्या जातात मात्र यावर्षी कोविड-19 मुळे कमी संख्येत सामाजिक दुरावा ठेवून विजयादशमी निमित्य छोटेखानी कार्यक्रम उत्साहात पार पाडण्यात आला.

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …