*गैरप्रकारात करण्याच नवीन प्रकार?*
*दंडात्मक कार्यवाहीतच गैरप्रकार*
*जिल्हाधिकारी चौकशी चे आदेश देतील काय?*
कोंढाळी प्रतिनिधी-दुर्गाप्रसाद पांडे
काटोल –आता!प्रशासकिय कारभारात गैरप्रकार करण्याकरीता नवीन प्रकार उघडकिस आला आहे ।
यात राजस्व विभागामाफर्त गौण खणिज परवाना दिल्या नंतर या गौण खणिज परवाण्याला उपयोग दुप्पट तिन पट तर अनेकदा चारपट गौणखणिज उत्खनन केल्या जाते, कुणी या बाबद माहीती विचारली तरी ते परवाना असल्याचे दर्शवितात, मात्र! योग्य ठिकाणी तक्रार केल्यावर त्या तक्रारीच्या चौकशी करीता आलेले पथक त्या पथकाने केलेली चौकशी व या चौकशीत आढलेल्या त्रृट्या व या त्रृट्यांवर होणार्या कार्यवाहीत लागनारा लाखों चा दंड काही हजावर आणन्यात मोठा गैर प्रकार होत आह। या बाबद नुकतेच काटोल तालुक्यातील कोंढाळी राजस्व मंडळात गौणखणिज उत्खनन प्रकरणी घडल्याची माहिती आहे।
या बाबद असे की कोंढाळी नागपुर महामार्गाचे चौपदरी करनाचे कामात कोंढाळी गावातील सेवामार्ग ( सर्व्हिस रोड)चे बांधकाम सुरू आहे, या बांधकामाला लागणारा मुरूम
कोंढाळी नजिकच्या बिहालगोंदी या आदीवासी बाहूल गावानजिकच्या खाजगी भूखंड धारकाचे भु खंडातून गौणखणिज खणिज परवाना घेऊन आणल्या जात असल्याचे समजले, या बाबद काटोल 26आक्टोबर 2020रोजी तहसील कार्यालयाकडे माहीती ती विचारली असता , त्यांचे कडून परवाना असल्याचे समजले मात्र तरीही चौकशी करन्या करीता कोंढाळी चे राजस्व मंडळ अधिकारी व कोंढाळी ग्राम अधीकारी यांना या गौणखणिज वाहतुक व उत्खनन प्रकरणी चौकशी चे सुचना मिळाल्या त्या प्रमाणे त्या अधिकार्यांनी चौकशी केली, यात मुरूम वाहतुक करनारे वाहन चालक यांचे कडे गौणखणिज परवाना बाबद विचारणा केली तेंव्हा चालका कडे असलेल्या पररवान्यात खाडा खोड दिसली चालका अधिक विचारना करत असतांना या कामावर असलेले अन्य वाहन चालकांनी आप आपली वाहतुक अचानकपने बंद केली, ।
खरे तर!काटोल येथील तहसील कार्यालयाकडून मंजूर गौणखणिज परवानगी व प्रत्यक्षात झालेले उत्खनन व वाहतुक करनारे वाहन चालक यांचे कडील परवाना यात आढलेल्या त्रृट्या या वर होणारी लाखों ची दंडात्मक कार्यवाही किंवा वाहन जप्तीच्या कार्यवाही करन्या पेक्षा फक्त काही हजार दंडात्मक कार्यवाही करन्यात आर्थिक देवाण घेवाण करून या कार्यालया मार्फत गौण खणिज परवाना बहाल करन्यात आला।
प्रशासनाचे नुकसान करनारे अधिकारी यांचे कारभाराची चौकशी करीता अतिरिक्त जिल्हाधिकारी, अतिरिक्त पोलिस अधिक्षक व जिल्हा रायल्टी अधिकार्यांची संयुक्त कमेटी गठित करून काटोल सह जिल्ह्यातील गौणखणिज परवाना किती ब्रास चा दिला किती उत्खनन झाले याबाबद चौकशी केल्यास कोट्यावधी चा घोटाळा सामोर येऊ शकतो ।
*गौणखणिज आदेश परवाना प्रिंटेड असावा*
गौणखणिज उत्खनन परवाना आदेश लिखीत ऐवजी संगणकिय किंवा टंकलिखीत आदेश निर्गमित करावे, याबाबद माहिती अशी की तालुक्यातील राजस्व विभागातील अधिकारी व लिपीक गौणखणिज परवाना आदेश लेखी स्वरूपी काढतात यात तारीख, वेळ, आपल्या सोईनुसार लिहिता येते । या करिता सर्व गौणखणिज परवाने टंकलिखीत किंवा संगणकिय पद्धतिचे असावे ।अशी ही मागणी होत आहे ।
*काटोल तालुक्यातील गौणखणिजच्या उत्खननाची चौकशी व्हावी*
खरे तर! तालुक्यातील गौणखणिजच्या खोदकाम व वाहतुकी साठी परवाना आदेश दिल्या जातो, मात्र एकदा ची रायलटी चे बुक मिळाले तर या रायलटी चे आधारे नियमावली चे उल्लघन करत मंजूर( ब्रास )क्षमते पेक्षा कितीतरी ज्यास्त उत्खनन केल्याच्या तक्रारी असुन या बाबद अधिक उत्खन झाल्याचे संधीत उत्खनन केलेल्या जागेवरून दिसुन येते । काटोल तालुक्यातील मसखापरा व दुधाळा (कोंढाळी)येथे सुरू असलेले मुरूम उत्खननांची अतिरिक्त जिल्हाधिकारी व जिल्हा रायलटी अधिकार्यांनी प्रत्येक्ष येऊन केल्यास खरे घबाड सामोर येईल ।