*धान पिकाला पावसाने तर झोपवल पण तूळ तूळा रोग मुळे शेतकरी ने धान पिकाला आग लावली*
धर्मापुरी प्रतिनिधि : नारायण जर्वेकर
मोरगाव : मौदा तालुक्यातील मोरगाव या गावी धक्कादायक घटना घडलेली बघावयास मिळाली.
स्वतः शेतकऱ्याने आपल्या शेतातील पिकाला चक्क आग लावली असून सोमा हरी निंबुळकर असे त्याचे नाव आहे.
या शेतकऱ्यांने आपल्या शेतात 1 हेकट्टर इतक्या जागेत भात लागवड केली असता त्यांच्या पिकाला काही कालावधी पासून खोड किड्यांनी धुमाकुड घातली होती आणि त्यांचे शेत हे वाळल्या प्रमाने झाले होते.
त्यांनी विविध प्रकारची औषध देखील फवारणी केली पण भात लागवडीवर नियंत्रण करू शकले नाही. काय करणार शेतकरी कुणावर आरोप करणार ,त्या पिकाला दवाई खुप मारली नेमक रिजल्ट 0 शेतकरी अखेर ते वैतागले व गेलेले पीक नियंत्रण करता येणार नाही पण जर पुन्हा आपण शेत पिकासाठी तयार केलं तर नवीन सुरवात करता येईल असं त्यांना वाटले त्यामुळे त्यांनी स्वतःच्या पिकाला आग लावली.
1 हेक्टर ला खर्च 25000 ते 30000 हजार खर्च आला पण शेतकरी ला 1 रुपये उत्तपन्न झाल नाही तरी शेतकरी हा थाम पने उभा असतो आणि पूर्व तयारी लागतो
आग लावतानी शेतकरी ला अश्रु आवरेना सारख झाल काय करणार कस कुटुब चलवनार कस जीवन जगणार त्याचा सामोरे खुप मोठा प्रश्न निर्माण झाल तरी बळी राजा उभा आहे
सदर शेतकऱ्याचे हजारो रुपयाचे नुकशान झाल्याचे स्पष्ट दिसत आहे
Maharashtra News Media सच की आवाज