Breaking News

*गडचादूर पोलिसांनी ट्रकमधून जप्तकेली ४0 लाख ८0 हजारांहून अधिक रूपयांचा मुद्मेमाल*

*गडचादूर पोलिसांनी ट्रकमधून जप्तकेली ४0 लाख ८0 हजारांहून अधिक रूपयांचा मुद्मेमाल*

कोरपना प्रतिनिधि – गौतम धोटे

कोरपना :-२०१५ पासून चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदोबस्त असून येथील मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील विविध तालुक्यातील गावात दारू तस्कर यांनी मोठय़ा प्रमाणात आपले जाळे पसरविले आहे . या सदर दारूबंदीचा मात्र फज्जा उढविला आहे असलातरी येथील पोलीस प्रशासन मात्र आपल्या परिने अवैध दारू तस्करी करणाऱ्याच्या चांगल्याप्रकारे मुसक्या आवळण्याची मोहीम असल्याने दारूतस्करांचे चांगलेच गावखेडात धाबे दणानले आहेत.येथील गुप्त माहितीच्या आधारे चंद्रपूर जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी गडचांदूर यांच्या नेतृत्वात यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथून एका ट्रक मधून अवैद्य दारूची तस्करी होत असल्याची माहिती मिळताच सूत्र हलवीत सापळा रचून नाके बंदी करून गडचांदूर शहरातिल कन्या शाळेजवळ मार्गावर M H 40 BG – 6947 या ट्रकची झडती घेतली असता २५७ देशी दारुच्या पेटी आढळल्या त्याची किंमत अंदाजे २५ लाख ७० हजार ट्रकची किंमत अंदाजे १५ लाख एकूण ४०,लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून यातील ट्रक चालक राहुल पाहुनकर या आरोपीला अटक करण्यात आली आहे सदर दारू तस्करीत आणखी तीन आरोपी ज्यांचा यात सहभाग आहे त्यांना अटक करायची असून हा दारूचा साठा कुठे जाणार असून त्यांचे रिसिव्हर कोण याबाबत पुढील तपास चंद्रपूर जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली गडचांदूर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी करीत असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील कुमार नायक यांनी दिली आहे.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …