*मोवाड गावाला अत्याधुनीक रूग्णवाहीका जनसेवेत*
*आता रुग्णवाहीका उपलब्ध होणार तात्काळ*
नरखेड प्रतिनिधी – श्रीकांत मालधुरे
नरखेडः गंभीर अथवा रुग्णाला नागपूर किंवा अमरावतीसारख्या मोठ्या शहरात उपचार घेण्यासाठी तातडीने जायचे असल्यास रुग्णवाहीकेची तासनतास वाट बघावी लागत असे अशावेळी रुग्ण गावातच दगावण्याच्या डोकेदुखीने मोवाडवासी बरेच कंटाळले होते.
त्याकरिता गेल्या आठ दहा महीण्यापासुन येथील नागरीकांची रुग्णवाहीकेची ओरड लक्षात घेता राज्याचे गृहमंत्री नामदार अनिल देशमुख यांच्या प्रयत्नाने नुकतीच मोवाड गावाला अत्याधूनीक रूग्णवाहीका जनतेच्या सेवत देण्यात आली. असुन “आता रुग्णवाहीकेची वाट बघावी लागणार नाही ” असे उद्गार मोवाडवासी नागरीकांनी बोलुन दाखवीले.
वसंतराव देशमुख प्रतिष्ठान , कोशिश फाऊंडेशन , व सोलार एक्स्प्लोसिव्ह ग्रुप आॅफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने काटोल विधानसभा मतदार क्षेत्रातील जनतेला वैद्यकिय उपचार सेवा उपलब्ध होण्याच्या उद्येशाने सहा रुग्णवाहीका व एक शववाहीका ही विजयादशमीच्या पर्वावर वाटप करण्यात आल्यात. त्यासाठी मोवाड येथील सामाजिक युवा कार्यकर्ते अनिल साठोणे , रंजनाताई सोळंकी , मंगेश नासरे , विवेक लिखार , रविंद्र कुंभारकर , विनय वैद्य , रविंद्र भंदिर्गे , विजय बिलगैये , सोहेल शेख , प्रदिप वाडबुध्ये , धिरज देवघरे , उमेश लहुळकर , अकबर पटेल , दिपक गजबे , योगेश क्षिरसागर , स्वप्निल बोरकर , या कार्यकर्त्यांनी वेळोवेळी रूग्णवाहीका मागणीचा तगादा लाऊन धरला होता.
अखेर मोवाड गावाला गावातील कार्यकर्त्यांच्या प्रयत्नातून व क्षेत्राचे लोकप्रिय जननेते,महाराष्ट्र शासनाचे गु्हमंत्री मा.अनिल बाबू देशमुख यांच्या पुढाकाराने आॅक्सिजनयुक्त व इतर अत्याधुनीक सोयीसुविधांनी परीपुर्ण अशी रुग्णवाहीका मिळाली असुन गाववासी नागरीकांनी कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त केले आहे.
Maharashtra News Media सच की आवाज