*अल्पवयीन मुलीचा विनयभंग आरोपी नराधमास अटक*
*सवंदनी येथील घटना*
देवलापार प्रतिनिधी- पुरुषोत्तम डडमल
देवलापार – शुक्रवार ३०ऑक्टोबर रोजी देवलापार परीसरातील फिर्यादीने पोलीस ठाण्यात येवुन तोंडी रिपोर्ट दिली कि,काल गुरुवारी २९ऑक्टोबर रोजी नामे अनुज शिवचंद आहाके (३५ )राहणार सवंदनी हयाने फिर्यादीची पिडीत अल्पवयीन मुलगी वय १५ वर्ष हि घराबाहेर एकटीच असल्याचे पाहुन तिला खर्रा देण्याचे बहाण्याने घरात नेवुन तिचा विनयभंग केला अशा माहितीवरून पो.स्टे.देवलापार येथे अप क २१२/२० कलम ३५४( अ ) ,३६३ ,भादवी सह कलम ८ पोक्सो अन्वये आज दि.३० ऑक्टोबर रोजी गुन्हा नोंद करण्यात येवुन घटनेचे गांभीर्य ओळखुन ठाणेदार प्रवीण बोरकुटे व परिपोउपनि लक्ष्मी घोडके हे त्यांच्या पोलीस चमूसह तात्काळ घटनास्थळी रवाना झाले व या बाबतची माहीती उप विभागीय पोलीस अधिकारी रामटेक व पोक्सो सेल अधिकारी सपोनि भुते यांना देण्यात आली.व त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा कार्यवाही केली.तसेच सदर घटने नंतर आरोपी गावातुन फरार असुन त्याचा शोध घेणे करीता पो.उप.निरिक्षक केशव पुंजरवाड यांचे सह पोलीसाची वेगळी टिम बनवुन आरोपीचा आजूबाजूच्या परीसरात तसेच जंगलात पोलिसांनी शोध घेतला असता आरोपी अनुज शिवचंद आहाके ( ३५ )राहणार सवंदनी यास ताब्यात घेवुन तात्काळ अटक करण्यात आली . सदर आरोपीस आज दि .३० ऑक्टोबर रोजी मा.न्यायाधीश यांचे समोर पेश करण्यात आले असता त्यास १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
सदर गुन्हयाचा तपास उप विभागीय पोलीस अधिकारी नयन आलुरकर यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोक्सो सेल अधिकारी सपोनि भुते मॅडम पो.स्टे.रामटेक या करत आहेत .
Maharashtra News Media सच की आवाज