Breaking News

*महामार्ग सुरक्षा पोलीस पथकाने वाहन चालकाला वाचविले*

*महामार्ग सुरक्षा पोलीस पथकाने वाहन चालकाला वाचविले*

कोंढाळी प्रतिनिधि – दुर्गाप्रसाद पांडे
नागपुर – 30 आक्टोबर चे सकाळी (पहाटे) ०४•३०वाजता चे दरम्यान नागपुर जिल्ह्यातील कळमेश्वर येथील एम आय डी सी येथुन औरंगाबाद येथे टिनपत्र्याचे रोल भरून जाणारा ट्रक क्रमांक एम एच-४०-वाय-४३७७ चे चालक राजेश साळवे(४२) रा बोजेगाव जि हिंगोली ला वाहन चालविण्या दरम्यान झोपेची डुलकी लागली अन् कोंढाळी पासून १२कि मि अंतरावरी खापरी (बा)फाट्यानजिक टिन पत्र्याचे रोल भरले ट्क पलटला, यात टिन पत्र्याचे रोल च्या तडाख्यात ट्रक चे कॅबिन चा चुराडा झाला। यात वाहन चालक राजेश साळवे व क्लिनर विश्वजीत बहूमाने हे ट्रक चे कॅबिन मधे गंभीर दुखापतीत अडकले । या घटनेचे ची माहिती नागपुर-अमरावती राष्ट्रीय महामार्ग सुरक्षा पोलीस खुर्सापार पथकाला मिळाली । घटनेची माहिती मिळताच महामार्ग सुरक्षा पोलीस खुर्सापार चे इंचार्ज उपनिरीक्षक राऊत, पो ह वा पाटील, शिपाई ढोके रोकडे वानखेडे सोमकुवर या पथकाने ने घटनास्थळी पोहचले तेंव्हा वाहन चालक व क्लिनर गंभीर जखमी अवस्थेत कॅबिन मधे अडकून होते । कॅबीन ला गैस कटर ने तोडून चार तासाचे प्रयत्ना नंतर चालक व क्लिनर ला गंभीर जखमी अवस्थेत कोंढाली आरोग्य केंद्र कोंढाळी येथे प्राथमिक उपचारा करिता दाखल केले• येथे डाक्टर अश्विनी दातीर व डाक्टर मोरे यांनी प्रथमोपचारानंतर नागपुर चे शासकिय रूग्णालयाला रेफर केले, या अपघाताची माहीती पोलीस स्टेशन कोंढाळी ला ही देण्यात आली ठाणेदार श्याम गव्हाने यांनी या प्रकरणी घटनास्थळ चौकशी करून पुढिल तपास करित आहेत ।
या भागातील अपघाती प्रसंगी या भागातील बी ओ टी वर सडक बांधकाम कंपनी ओरिय॔टल टोल वेज कारंजा यांचे कडून वेळेवर मदत मिळत नसल्याचे स्थानिक उपस्थित नागरीकांनी सांगितले, तर ओरिय॔टल टोल वेज चे व्यवस्थापक रविंद्र वौद्य यांनी सांगितले की माहिती मिळताच येथील बचाव पथक रवाना केले होते।

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …