Breaking News

*अवैध मासेमाऱ्यांनी ३० ते ४० बोटीच्या सहाय्याने ६० ते ७० लोकांनी संरक्षण कुटीस घेराव घालून वन कर्मचाऱ्यांवर केला हल्ला* *वन विभागाकडून गोळीबार ; तोतलडोह जलाशयातील घटना*

*अवैध मासेमाऱ्यांनी ३० ते ४० बोटीच्या सहाय्याने ६० ते ७० लोकांनी संरक्षण कुटीस घेराव घालून वन कर्मचाऱ्यांवर केला हल्ला*

*वन विभागाकडून गोळीबार ; तोतलडोह जलाशयातील घटना*


 *वन विभागाची बोट पेटवली , तोतलाडोहचे पाणी पुन्हा पेटले*

*या हल्ल्यात वनविभागाचे २५ लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज*

 

देवलापार प्रतिनिधी – पुरुषोत्तम डडमल

देवलापार – पेंच व्याघ्र प्रकल्प,महाराष्ट्र अंतर्गत असणाऱ्या तोतलाडोह जलाशयात अवैध मासेमारीवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने वन विभाग कार्य करत आहे .सदर वन हे राखीव वन असून अवैध मानवी हस्तक्षेपास येथे पूर्ण प्रतिबंध आहे. या क्षेत्राच्या संवर्धन आणि सुरक्षेकामी वन कर्मचारी दिवस रात्र कार्यरत असतात.जलाशयातील अवैध मासेमारी वर प्रतिबंध करण्यासाठी विशेष संरक्षण दल यांच्या मार्फत जलाशयात नियमित बोट गस्ती केली जाते,याकामी मध्य प्रदेश वन विभाग यांचे सोबत संयुक्त गस्तीचा देखील समावेश आहे.

काल दि.१/११/२०२० रोजी विशेष व्याघ्र संरक्षण दलाचे बन कर्मचारी तोतलाडोह जलाशयात अवैध मासेमारी विरुद्ध गस्ती करण्यासाठी गेले असता रात्री अंदाजे ८ वाजताच्या सुमारास दक्षिण बोदलझिरा नियतक्षेत्रातील तुमडीमट्टा संरक्षण कुटी येथे जेवण करण्यासाठी गस्ती पथक आले असता याच संधीचा फायदा घेऊन ३०-४० बोटीच्या सहाय्याने अंदाजे ६०-७० लोकांनी संरक्षण कुटीस घेरले आणि शिविगाळ करत दगडफेक करुन हल्ला केला. मासेमारांनी दार फोडन्याच्या इराद्याने दारावर दगडफेक सुरु केली तसेच डायनामाईट चा वापर सुरु केला, काही लोकांनी पत्र्याच्या शेडमध्ये घुसून शासकीय साहित्याची तोडफोड सुरु केली तसेच छतावर चढून सोलर पैनलची नासधूस केली.आत घुसलेल्या लोकातील काही जण किचन मध्ये असणारे गैस सिलेंडर काढून त्याचा स्फोट करण्याचा प्रयत्न करू लागल्याने स्वताच्या व इतरांच्या जिवाच्या सुरक्षेसाठी विशेष व्याघ संरक्षण दलाच्या जवानांनी आतून गोळीबार केला . गोळीबार सुरु झाल्याचे कळताच मासेमारांनी पाण्यात उभी असलेली शासकीय बोट आपल्यासोबत घेउन गेले आणि जवळच्या टापू जवळ नेऊन जाळली. वन परिक्षेत्र अधिकारी ताटे यांचे वन विभागाचे अतिरिक्त मनुष्यबळ आल्यानंतर कुटी जवळच्या सर्व भागाची पाहणी केल्यानंतर कूटीत बंदिस्त असलेल्या इतर सहकारी यांची सुटका करण्यात आली.यावर रितसर वन गुन्हा नोंद केला असून पेंच व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक अमलेंदु पाठक यांचे मार्गदर्शनात पुढील तपास सहायक वन संरक्षक अतुल देवकर,वन परिक्षेत्र अधिकारी मंगेश ताटे आणि क्षेत्र सहाय्यक एस.बी.केकान करत आहेत.

मागील महिन्यापासून अवैध मासेमारी विरुद्ध दोन्ही राज्यानी प्रभावी काम करून मासेमारांचा बंदोबस्त केला होता. उप विभागीय अधिकारी , रामटेक ज्योगेंद्र कट्यारे यांनी देखील जलाशयाला भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली होती.मध्य प्रदेश वन विभागाने दि.६/१०/२०२० रोजी अवैध मासेमारी करून मासे वाहतुक करणारी तीन वाहने जप्त केली तर पाच लोकांना अटक केली होती.महाराष्ट्र वन विभागाच्या वतीने देखील अनेक बोटी आणि जाळे जप्त करून कारवाई केली होती. या वेगवेगळ्या कारवाई मुळे धास्तावलेल्या मासेमार गटाने अश्याप्रकारचे कृत्य केले आहे .घटनेचे गांभीर्य पाहून सहायक वन संरक्षक ( अवैध शिकार प्रतिबंधक कक्ष ) अतुल देवकर , सहायक वन संरक्षक , वि . व्या . सं . दल ) महेश परब आणि ठाणेदार प्रवीण बोरकुटे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि वनकर्मचारी यांना पुढील सुचना दिल्या. या सर्व घटनांचा विचार करता मासेमारांनी राखीव वनात अवैधरीत्या प्रवेश करुन शासकीय कर्तव्यावर असणा शासकीय कर्मचाऱ्यांवर जिवघेणा हल्ला केला आहे तसेच शासकीय मालमत्तेचे प्रचंड नुकसान ( अदाजे २५ लक्ष केले आहे.यावर देवलापार पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा नोंद केला असून पुढील तपास ठाणेदार प्रवीण बोरकुटे पोलीस उपनिरीक्षक केशव पुजरवाड़ करीत आहेत.
वन विभागाच्या मार्फत संरक्षण कुटी च्या बाजूने लावलेल्या छुप्या कैमरा मध्ये आरोपींचे फोटो आल्याने त्यांची ओळख पटवून त्यांचा तपास करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.या घटनेच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राज्याच्या वतीने गस्ती मध्ये वाढ करण्यात आली असून अतिरिक्त पोलिस तसेच इतर व्याघ्र प्रकल्पातील विशेष व्याघ्र संरक्षक दलाची कुमक मागवली आहे .पेंच व्याघ्र प्रकल्पात सध्या राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या तसेच विशेष व्याघ्र संरक्षण दलाच्या दोन तुकड्या कार्यरत आहेत.अवैध मासेमारी करणाऱ्या मासेमाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे संकेत वन आणि पोलिस प्रशासनाने दिले आहेत.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …