Breaking News

*वरोरा पोलीस स्टेशन मध्ये पार पडला निरोप समारंभ ,नवीन ठाणेदार यांचे स्वागत*

*वरोरा पोलीस स्टेशन मध्ये पार पडला निरोप समारंभ ,नवीन ठाणेदार यांचे स्वागत*

वरोरा प्रतिनिधि – मुजम्मील शेख

वरोरा- पोलीस ठाण्यात मागील दोन वर्षापासून ठाणेदार उमेश पाटील कार्यरत होते.मागील दोन वर्षात त्यांनी वरोरा शहरावर आपली वचक ठेवली होती,गुन्हेगारीचे प्रमाण कमी करण्याचे काम त्यांनी केले.त्यांची बदली आदेशानुसार 30 /10/2020 ला बल्लारपूर ठाण्यात झाली.तसेच वरोरा पोलिस स्टेशनला नवीन ठाणेदार म्हणून दिपक खोब्रागडे यांची बदली झाली याआधी ते दुर्गापूर पोलीस स्टेशन येथे कार्यरत होते.

तसेच वरोरा पोलीस ठाण्यातील पोलीस सहायक पोलीस निरीक्षक सोनटक्के यांची विनंतीनुसार बदली नागपूर ग्रामीण येथे झाली तर सहायक पोलीस निरीक्षक मिश्रा यांची बदली रामनगर पोलीस स्टेशन येथे झाली.त्या निमित्ताने आज दिनांक 3/11/2020 ला पोलीस स्टेशन वरोरा येथे स्वागत व निरोप समारंभ एकत्र पार पडला.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …